Thursday, March 30, 2023

व्हिडिओ: वडिलांच्या बर्थडे पार्टीत तुफान नाचला वरुण धवन, सोबतच कार्तिक आर्यननेही लावले ठुमके

बॉलिवूड चित्रपट निर्माते डेव्हिड धवनने नुकताच ७१ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिग्गज अभिनेते अनुपम खेर, सतीश कौशिक, शक्ती कपूर ते मुलगा वरुण धवन, युवा अभिनेते कार्तिक आर्यन आणि राजपाल यादव देखील सामील झाले होते. पार्टीदरम्यान एका व्हिडिओमध्ये वरुण आणि कार्तिक एकत्र जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

दोन्ही यंग स्टार्सनी जबरदस्त डान्स केला
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन आणि वरुण धवन हे एकत्र जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांची पावले तंतोतंत जुळवताना दिसतात. यादरम्यान वरुण पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टसह निळ्या डेनिममध्ये दिसत आहे. दुसरीकडे, कार्तिक निळ्या रंगाच्या टी-शर्टसह तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान करून खूपच मस्त दिसत आहे. व्हिडिओमध्ये या दोन तरुण स्टार्सला एकत्र पाहिल्यानंतर चाहते आता त्यांना चित्रपटातही एकमेकांसोबत पाहण्याची वाट पाहत आहेत. डान्स व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

वरुणने कार्तिक आणि साराला हात धरून एकत्र आणले
वरुण धवन (Varun Dhawan) आणि कार्तिक आर्यन (Kartik aaryan)हे इंडस्ट्रीचे असे मित्र आहेत जे बर्‍याचदा इव्हेंट्समध्येही एकत्र दिसतात. नुकत्याचं एका कार्यक्रमादरम्यान, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकमेकांकडे दुर्लक्ष करत असताना वरुण धवनने दोघांचा हात धरला आणि एकत्र उभे केले, त्यानंतर दोघांनी फोटोसाठी पोज दिली. कामाबद्दल बोलायचे झाले तर वरुण नुकताच कियारा अडवाणीसोबत ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसला होता, तर कार्तिक आर्यनच्या नुकत्याच आलेल्या ‘भूल भुलैया २’मध्येही कियारासोबत त्याची जोडी दिसली होती. कार्तिकचा हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पारंपारिक ड्रेसमध्ये मौनी रॉयचा जलवा, फोटोंवरून हटणार नाही नजर

‘दीपवीर’ने अलिबागमध्ये खरेदी केले नवीन घर, ‘एवढे’ कोटी मोजत बनले मालक, गृहप्रवेशाची पूजा संपन्न

राशी खन्नाच्या फोटोंनी वाढवलं तापमान

हे देखील वाचा