Thursday, March 28, 2024

अभिनयाला घाणेरडा व्यवसाय मानायचे अशोक कुमार, तर हिरो बनल्यामुळे तुटलं होतं अभिनेत्याचं लग्न

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. ते एक सदाबहार अभिनेता होते. पण विशेष म्हणजे, ते असे पहिले बॉलिवूड अभिनेते होते, ज्यांना हिरो बनण्याची संधी मिळाली होती. लोक त्यांना दादामुनी या नावाने हाक मारत असत. त्यांचे हे नावच त्यांची सिग्नेचर होती. पण तुम्हाला माहिती आहे का? की लहानपणी अशोक यांचे नाव कुमुद लाल गांगुली होते. नंतर त्यांनी आपले नाव बदलून अशोक कुमार ठेवले होते. पण त्या काळात अभिनेता बनणे सोपे नव्हते, कारण त्या काळात अभिनय हा एक घाणेरडा व्यवसाय मानला जात होता. अशोक कुमार म्हणत, “त्या काळात कॉल गर्ल्स हिरोईन बनत असत आणि दलाल हिरो बनत असत.” अशोक कुमार यांच्या घरी जेव्हा ते अभिनेता बनल्याचे कळले, तेव्हा तर हे ऐकून त्यांच्या घरात गोंधळच उडाला. इतकेच नव्हे, तर त्यांचे लग्नही तुटले. शुक्रवारी (10 डिसेंबर) अशोक कुमार यांना जगाचा निरोप घेऊन 22 वर्षे झाली. यानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

अशोक कुमार यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे वकील व्हायचे होते. पण ते बॉम्बे टॉकीजमध्ये साऊंड इंजिनीअर म्हणून रुजू झाले आणि उत्पादनाचे इतर विभागही तेच पाहायचे. (death anniversary 10 funny things about ashok kumar)

ते असे पहिले बॉलिवूड अभिनेता होते, ज्यांना हिरो बनण्याची संधी मिळाली. त्यांचा पहिला चित्रपट ‘जीवन नैया’मध्ये, अभिनयासोबतच त्यांनी एक गाणेही गायले होते.

त्यांची हिरो बनण्याची कहाणीही बरीच रंजक आहे. खरं तर, अभिनेत्री देविका राणींचा (Devika Rani) नायक नजिमल हुसैन सेटवरून पळून गेला होता, त्यामुळे बॉम्बे टॉकीजचे हिमांशू रॉय खूप नाराज झाले होते. तेव्हा हिमांशू यांची नजर अशोक यांच्यावर गेली आणि ते म्हणालले की, “आता तू देविकाचा हिरो आहेस.” विशेष गोष्ट अशी की, देविका राणी आणि अशोक कुमार यांची जोडीही खूप गाजली.

अशोक जेव्हा हिरो बनले, तेव्हा त्यांच्या घरात चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यांचे ठरलेले लग्नही मोडले. रडून त्यांच्या आईची हालत खराब झाली होती. वडील ताबडतोब नागपूरला गेले आणि त्यावेळी मुख्यमंत्री असलेले त्यांचे महाविद्यालयीन मित्र रविशंकर शुक्ला यांना भेटले आणि मुलाला नोकरी देण्यास सांगितले. शुक्ला यांनी त्यांना दोन नोकऱ्यांची ऑफर लेटर दिली. ते पत्र घेऊन ते हिमांशु रॉय यांच्याकडे गेले. पण रॉय यांनी ते पत्र फाडले.

अशोक कुमार हे देशातील पहिले सुपरस्टार ठरले. स्थिती अशी होती की, ते घरातून बाहेर पडले की त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. काही वेळा तर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. मोठमोठ्या घराण्यातील स्त्रियाही त्यांच्यावर मोहित होत्या.

अशोक कुमार यांचा विवाह शोभा देवी यांच्याशी झाला होता. जेव्हा ते त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते 18 वर्षांचे होते आणि शोभा फक्त 8 वर्षांच्या होत्या. लग्न ठरलं. शोभा 15 वर्षांच्या आणि अशोक 25 वर्षांच्या असताना त्यांनी लग्न केले. पण दोघांनी पूर्ण आयुष्य एकत्र घालवले.

साल 1943 मध्ये ज्ञान मुखर्जी यांच्या ‘किस्मत’ चित्रपटात अशोक कुमार यांनी गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. 100 कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. हा चित्रपट वर्षभर थिएटरमध्ये चालला होता.

अशोक कुमार यांनी त्यांच्या पत्नीला धोका दिला होता. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “लग्नाच्या 13 वर्षांपर्यंत विश्वासू राहिलो. पण नंतर मी पिण्यास सुरुवात केली. इतर मुलींना भेटायला आणि प्रेमसंबंध ठेवायला सुरुवात केली. माझी नायिका नलिनी जयवंत हिच्याशीही माझे अडीच वर्षे प्रेमसंबंध होते. याची सगळीकडे चर्चा होत होती, पण माझ्या बायकोने यावर कधीच विश्वास ठेवला नाही.”

अशोक कुमार यांची कारकीर्द 60 वर्षे चालली. तर त्यांनी 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अखेरच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत अशोक कुमार यांना अस्थमाचा त्रास होता. 10 डिसेंबर2001 रोजी, हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

हेही वाचा-
पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब
‘आता ती वेळ आली आहे…’ म्हणत विद्युत जामवालने लैंगिक समस्यांसाठी सांगितले तब्बल 19 व्यायाम प्रकार

हे देखील वाचा