Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड शाहरुखला दुसरी महिला मिळाली, तर काय करणार गौरी? उत्तर ऐकून तुमच्याही डोक्याला बसेल शॉट

शाहरुखला दुसरी महिला मिळाली, तर काय करणार गौरी? उत्तर ऐकून तुमच्याही डोक्याला बसेल शॉट

सुपरस्टार शाहरुख खान याला ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याच्या हृदयावर एकच व्यक्ती राज्य करते, ती म्हणजे त्याची पत्नी गौरी खान. किंग खान जेव्हा 18 वर्षांचा होता, तेव्हापासून त्याचा जीव गौरीवर जडला आहे. गौरीवर असलेल्या प्रेमापोटी तो काहीही न माहिती घेता तिच्या मागे मुंबईला गेला होता. त्याने सांगितल्याप्रकारे, प्रेम जर खरे असेल, तर काहीही अशक्य नाही. खूपच प्रयत्न केल्यानंतर शाहरुखने गौरीला शोधून काढले. अनेक चढ-उतार येऊनही गौरी अन् शाहरुखने 1991मध्ये संसार थाटला. ते आर्यन, सुहाना आणि अबरामचे आई-वडील आहेत. तो तिघांवरही जीवापाड प्रेम करतो.

शाहरुखला दुसरी महिला मिळाली, तर काय करणार गौरी?
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिने करण जोहर (Karan Johar) याच्या ‘कॉफी विथ करण १’मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान एका सेगमेंटमध्ये गौरीने इतर महिलांबद्दल वक्तव्य केले होते. शाहरुखला दुसरी महिला मिळाली, तर तिची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न तिला करण्यात आला होता. जेव्हा करणने तिला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तिने उत्तर दिले होते की, “हा प्रश्न मला कोणी विचारल्यावर सुरुवातीला मी चिडते. मी नेहमी देवाला प्रार्थना करते की, जर त्याला कोणीतरी भेटली, तर मलाही कोणीतरी चांगला भेटावा, जो दिसायलाही चांगला असावा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

शाहरुखला गौरीने दिली होती चेतावणी?
काही वर्षांपूर्वी शाहरुख आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्यात काहीतरी सुरू असल्याची अफवा पसरली होती. ‘डॉन’ आणि ‘डॉन २’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. अनेकांनी त्यांना एकत्र वेळ घालवतानाही पाहिले होते. शाहरुखची पत्नी गौरी यावरून चांगलीच संतापली होती. असे म्हटले जाते की, गौरीने शाहरुखला चेतावणी दिली होती की, तो कधीही प्रियांका चोप्रासोबत दिसणार नाही.

पत्नीसाठी सिनेमे सोडून देईल शाहरुख
शाहरुख खान याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, जर कधीही त्याला करिअर आणि गौरीपैकी एकाला निवडावे लागले, तर तो सिनेमे सोडून देईल. एका जुन्या मुलाखतीत शाहरुख आणि गौरीने सन 1997मध्ये टॉक शो ‘रेंडझवस विथ सिमी गरेवाल’मध्ये भाग घेतला होता. या जोडप्याने त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल चर्चा केली होती. जेव्हा गौरीला विचारण्यात आले की, शाहरुख नेहमीच प्रोटेक्टिव्ह राहिला आहे का? यावर उत्तर देताना तिने सांगितले होते की, तो पझेसिव्हपेक्षा जास्त प्रोटेक्टिव्ह आहे.

शाहरुखच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ यांसारख्या आगामी सिनेमात झळकणार आहे. शाहरुख तब्बल 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप; म्हणाला, ‘मी तर नामर्द आहे’
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल
सोनालीवर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा वापर करायचा सुधीर सांगवान, जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

हे देखील वाचा