Tuesday, October 27, 2026
Home › बॉलीवूड › रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाची ट्रोलरविरोधात कायदेशीर कारवाई, सायबर क्राइममध्ये केली तक्रार

रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाची ट्रोलरविरोधात कायदेशीर कारवाई, सायबर क्राइममध्ये केली तक्रार

काॅफी विथ करण 9 मध्ये सहभागी झाल्यानंतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांनी काही वक्तव्य केले होते. त्यानंतर नेटकऱ्यानी त्याच्या वक्तव्यावर ट्रोल केले आणि आता विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्यावर होणाऱ्या ऑनलाइन टीकेवर आता कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्या टिमने हैदराबाद सायबर गुन्हे प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्ररीत या जोडप्याला लक्ष्य करुन बनावट मजकुर, तसेच ऑनलाइन छळ केल्याचा आरोप आहे. टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हणले आहे की, सोशल मीडीयावरील पोस्ट, ऑनलाइन लेख आणि इतर डिजीटल मजकुराचा उल्लेख केला आहे. ज्यांची चौकशी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. 

या तक्ररी दरम्यान केलेल्या निवेदानात टिमने म्हणले आहे की, अभिवेक्ती स्वातंत्र्य वैयक्तिक मते आणि सार्वजनिक व्यक्तीवर टीका करण्याच्या अधिकाराचा करतात, मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे की, मत व्यक्त करणे आणि बनावट किंवा दिशाभुल करणारे दावे तथ्य म्हणुन सादर करणे यातील फरक सांगितला आहे.

तसेच टिमने ही तक्रार देण्यापुर्वी, रश्मिकाने विजयसोबतच्या तिच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना सांगितले की, तिचे तिच्या पतीवर खूप प्रेम आहे. करणने शो दरम्यान अनेक प्रश्न विचारले आणि त्यादरम्यान विजय (vijay)म्हणाला की 100 वेळा मला लग्नासाठी विचार असं मी रश्मिकाला सांगितल होत. आणि यावर अनेक नेटकऱ्यानी मीम्स आणि रिल तयार केले होते, आणि वियजला ट्रोल केले होते. तर यावर नुकतच रश्मिकाने उत्तर देत म्हणाली आहे की,’मी त्याच्या प्रेमात वेडी आहे, 100 नाही 1000 वेळा विचारेल. असं म्हणत रश्मिका मंदानाने केली ट्रोलर्सची बंद बोलती केली आहे.

हेही वाचा

रामायणच्या VFX मध्ये चुका शोधू नका, अभिनेता यशनं केलं प्रेक्षकांना आवाहन

 

हे देखील वाचा