पुणे : ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे आणि समीर धर्माधिकारी यांच्यासह शर्वरी जेमिनीस, शिवराज वाळवेकर आणि मंदार कुलकर्णी अशी दमदार कलाकारांची फळी आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून AM Productionsने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून, चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस भागवत (bhagwat)यांनी केले असून, सचिन बांगर यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण योगेश कोळी यांनी केले आहे.
पुण्यात पार पडलेल्या चित्रीकरणात संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम करत चित्रपट पूर्ण केला. दर्जेदार आशय आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. चित्रपटाचे नाव, प्रदर्शनाची तारीख आणि इतर माहिती निर्मात्यांकडून योग्य वेळी जाहीर करण्यात येईल.
हेही वाचा










