अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मलायकाचे पहिले लग्न अभिनेता अरबाज खानसोबत (Arbaaz khan) झाले होते. एका फोटोशूटदरम्यान दोघेही पहिल्यांदा भेटले होते आणि पहिल्याच नजरेत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे म्हटले जाते. यानंतर मलायका आणि अरबाजने काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1991 मध्ये लग्न केले. या लग्नातून त्यांचा मुलगा अरहान खानचाही जन्म झाला. अरहान सध्या परदेशात असून पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.
मात्र, मलायका आणि अरबाजने लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र, आता मलायकाला ती सेल्फ मेड असल्याचे का म्हणावे लागले या घटनेकडे वळू. ‘दिल से’मधील ‘छैयां छैयां’ आणि त्यानंतर ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या आयटम साँगने मलाइकाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.
मलायकावर बोलताना, इंडस्ट्रीची ‘ड्रामा क्वीन’ म्हटल्या जाणार्या राखी सावंतने एकदा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, सलमान खानच्या कुटुंबातील असल्याने मलायकाला आयटम गर्ल म्हणून ओळखले जात नाही.
खान कुटुंबामुळेच मलाइकाला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्याचेही राखीने म्हटले होते. राखीच्या या प्रकरणावर संताप व्यक्त करताना मलायका म्हणाली होती की, ‘असे असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात आयटम साँग करायला हवे होते. यानंतर मलायका म्हणाली की, ‘मी सेल्फ मेड आहे, मला सलमान खानने बनवले नाही’.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न
ईशान खट्टरची स्वप्नपूर्ती, समुद्र किनारी घेतले नवे घर
बोलता बोलताच जुंपली! अभि लतिकाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल










