कोविड 19 च्या काळात अनेक रील त्याचे गाणे फेमस झाले होते. आणि त्यातील एक म्हणजे फैसल शेख यांनी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ या गाण्यावर आधारित एक रील तयार केली, जी खूप चर्चेचा विषय बनली होती. त्यानंतर हि रिल प्रंचड गाजली आणि फैजू एका रात्रीत स्टार बनले. आणि त्या गाण्यावर अनेकांनी रील बनवली आणि आता नुकत्याच झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान काही इन्फ्लुएन्सर्सनी त्यावर रील बनवल्या होत्या आणि खुप व्हायरल झाल्या. आता या गाण्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी या व्हायरल ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहुन चाहते हि आंनदी झाले आहे. आणि यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर रणवीर शौरीने पुन्हा पोस्ट करत लिहिले आम्हाला 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवुन दिल्याबाबत धन्यवाद. ताहिरा कश्यपने हसणारे इमोजी दिले आहे. तर अनेकांनी याला ट्रेंड विनर म्हणले आहे. तर काहिनी कुल रील असे म्हणले आहे. तर एका म्हणले आहे की, मी हि किती वेळा पाहिली हे मी मोजु शकत नाही. तर या रीलला इन्स्टावर आतापर्यत 6.3 दशलक्ष व्हुयुज मिळाले आहेत.
अभिनेता अनुपम खेर (kheer) यांच्याबाबत बोलायचे झाल्यास ते नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असतात. आणि ते ‘खोसला का घोसला 2’ तसेच ‘श्री रामभूमी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. नुकतेच, अनुपम खेर यांनी एका पोस्टमध्ये चित्रपटातील आपला पहिला लूक शेअर केला आणि ही एक मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले.
हेही वाचा
दीपिका पदुकोणने दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत व्हिडिओ शेअर करत दिले अपडेट










