सिनेमासृष्टीत कलाकार नेहमीच धक्कादायक खुलासे करत असतात. कधी ते वैयक्तिक आयुष्याशी निगडीत खुलासे करतात, तर कधी व्यावसायिक आयुष्याशी निगडीत. अशीच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी आहे, जिने तिच्या पतीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ती महिला इतर कुणी नसून अभिनेता संजय कपूर याची पत्नी महीप कपूर ही आहे. महीपने पती संजय कपूरवर आराेप लावत मोठा खुलासा केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण चला जाणून घेऊया…
माध्यमांशी बोलताना महीप कपूर (Maheep Kapoor) हिने सांगितले की, संजय कपूर (Sanjay Kapoor) याने तिला धोका दिला होता. शो दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करणे साेपे नव्हते. महीपने सांगितले की, “मला आशा आहे की, स्त्रियांना हे समजेल की, लोक ज्याप्रमाणे विचार करतात, तितके वास्तविक आयुष्यात काहीही चांगले नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आपण सर्व यातून जातो आणि हे इथे सांगणे महतत्वाचे हाेते.”
ज्यावेळी महीप कपूरला विचारण्यात आले की, याविषयी तुम्ही संजय कपूरशी चर्चा केली आहे का? तर तिने आतापर्यंत चर्चा न केल्याचे सांंगितले. ती म्हणाली की, “आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर आणि सुंदर असतेच असे नाही. शोमध्ये तुम्हाला दिसेल की, आमच्या आयुष्यातही अनेक समस्या आहेत. संजयलाही याची माहिती नाही, त्याला शो पाहिल्यावर कळेल.”
View this post on Instagram
‘शनायाला घेऊन निघालेली’
पुढे बोलताना तिने सांगितले की, “लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात संजय खूप विचित्र वागत होता. मी फक्त शनायाला उचलून घराबाहेर पडले. मी स्वतःसाठी उभे राहिले. माझ्याकडे छोटी शनाया होती. एक स्त्री आणि आई म्हणून माझ्यासाठी माझे मूल पहिले आहे. माझी मुलगी एका चांगल्या वडिलांसाठी पात्र आहे, जो संजय देखील आहे. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मी तुटून पडते. मी संजयला सोडले असते, तर कदाचित त्याला आणखी एक संधी न दिल्याचा मला पश्चाताप झाला असता.”
“कारण जेव्हा माझी मुलं घरात येतात आणि माझा नवरा घरात येतो, तेव्हा मला एक शांतता जाणवते. प्रत्येकाला शांत व्हायचं असतं. मला वाटते फक्त संजयच मला शांत करू शकतो,” असेही पतीबद्दल बोलताना महीप म्हणाली.
माफ केले
महीप कपूरने सांगितले की, “संजय आणि मी आयुष्यात अनेक गोष्टींसाठी एकमेकांना माफ करत आलो आहोत. असे बरेच टप्पे होते जिथे आम्ही दोघांनी एकमेकांना पाठिंबा दिला आणि माफ केले. संजयने मला अनेकवेळा फसवण्याचा प्रयत्न केला, पण मी नेहमीच यशस्वी झाले. आम्ही दोघेही हा प्रवास पुढे नेत आलो आहोत. आम्ही दोघे आता मजबूत आहोत.”
View this post on Instagram
‘फेब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) चा सीझन 2 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. सीझन 2 बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या सीझनमध्ये पहिल्या सीझनपेक्षा ड्रामा, मारामारी आणि धक्कादायक खुलासे बघायला मिळणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर त्यांच्या आयुष्याशी संबंधित सांगताना दिसणार आहे. या सिझनमध्ये बादशाह, सनी देओल, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, अनन्या पांडे आणि करण जोहर यांचे कॅमिओ दिसणार आहेत. याव्यतिरिक्त झोया अख्तरही या शोमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्लेड अन् दगडांच्या ड्रेसनंतर अभिनेत्रीने शरीर झाकण्यासाठी वापरली फुलं, चालता चालता गेला तोल अन्…
एक-दोन नाही, तर पवन कल्याणने ३ वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’