Tuesday, July 23, 2024

ब्लेड अन् दगडांच्या ड्रेसनंतर अभिनेत्रीने शरीर झाकण्यासाठी वापरली फुलं, चालता चालता गेला तोल अन्…

सोशन मीडियावर नेहमी सक्रिय असणारी उर्फी जावेद आपल्या कौशल्याने ड्रेस डिझाइन करते. तिच्या ड्रेसच्या सेन्सचा कोणाकडे तोडच नसतो. ती खूपच वेगळ्याप्रकारे तिचे कपडे बनवत असते. आतापर्यत तिने ब्लेड, काच, दगड, चांदीवर्ख, पोते अशा गोष्टींनी तिचा ड्रेस बनवलाये. अशात उर्फीचा नवीन लूक चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तिचा हा लूक पाहून पाहणाऱ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून नवीन प्रकारचे आऊटफिट तायार करत असते. तिच्या या ड्रेसिंग सेन्समुळे ती काही लोकांचे मन जिंकते, तर कधीकधी तिला जोरदार ट्रोल केले जाते. तिच्या कपड्यांना पाहून लोकांचे डोळेच फिरतील, असे आऊटफिट ती तयार करत असते.

उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने डेनिमसोबत शरीरावर फुले लावलेले दिसत आहेत. या फुलांना चिकटपट्टीने शरीरावर चिटकवले आहे. याच चिकटपट्टीच्या मदतीने उर्फीने आपला टॉप बनवला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी एका गार्डनमध्ये चालताना दिसत आहे. चालता चालता ती धडपडताना देखील दिसत आहे. यामुळे चाहते तिच्या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काही चाहते मजेशीर कमेंट करत आहेत, तर काही चाहते फायर आणि हार्ट वाले इमोजी शेअर करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “हे तेच फुल आहे, जो मी बुके दिला होता?” आणखी एकाने लिहिले आहे की, “तुम्ही तुमचे कौशल्य दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत.” अशा प्रकारच्या कमेंटने उर्फीजावेदवर बरसात केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक-दोन नाही, तर पवन कल्याणने ३ वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा

हे देखील वाचा