Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

शहनाज गिलने भावासाेबत घेतले ‘लालबागच्या राजा’चे दर्शन, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूने वेधले सगळ्यांचे लक्ष

मनाेरंजन क्षेत्रात सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ‘बिग बॉस 13’ या शाे मधुन प्रसिद्धच्या झाेतात आली.  शहनाजने तिच्या चुलबुल्या किरदारने आणि मेहनतीने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले. तिचे सोशल मीडियावर काेराेडाे फॅन्स आहेत. तिचे फाेटाे आणि व्हिडिओ साेशल मिडीयावर येताच व्हायरल हाेतात. प्रेक्षकांना तिचा चुलबुला अंदाज फार आवडताे. साेमवारीतीने भाऊ शहबाज बदेशासाेबत मुंबई येथील लालबागचा राजा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 

त्यासंर्दभात तिचे फाेटाे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. सेलिब्रेटी फाेटाेग्राफर विरल भयानी ह्यांनी त्याच्या अधिकृत अकाउंंटवर शहनाज गिलचा व्हि़डिओ आणि फाेटाे शेअर केले आहे. या फाेटाेमध्ये शहनाज पिवळा रंगाचा ड्रेस घालून खुप सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती आरती दरम्यान भावासाेबत उभी असताना दिसत आहे.

त्यादरम्याण, दाेघे फोटोसाठी पोज देताना दिसले. त्यावेळी शहबाजच्या हातावर दिवंगत सिद्धार्थ शुक्ला याचा टॅटू गाेंदलेला दिसला. या टॅटूने लाेक्ंचे लक्ष आपल्याकडे वेधले. शहनाजच्या व्हिडिओ आणि फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे.

व्हिडीओवर शहनाजच्या चाहत्याने लिहिले, “या ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसत आहात.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, सनाने किती प्रेमाने सिडचा टॅटु पकडुन ठेवला आहे.”, तर तिसऱ्या चाहत्याने लिहिले, “लव यू प्रेमळ साेल”. बऱ्याच यूजर्सने शहनाजची स्थुती करत हॅशटॅग मध्ये हॅशटॅग सिडनाज लिहीले.

शहनाजच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मात्र, शहनाज आणि चित्रपट निर्मात्यांनी याविषयी अधिकृत घाेषणा केली नाही. चित्रपटात पूजा हेगड़े मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 राेजी प्रदर्शित हाेणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
धक्कादायक! सोनालीच्या हत्येनंतर मुलगी यशोधराच्या जीवाला धोका? कुटुबीयांकडून सुरक्षेची मागणी

लेकीला घेवून गणपती विसर्जनासाठी आला दाक्षिणात्य सुपरस्टार, अल्लू अर्जुनच्या साधेपणावर चाहते झाले फिदा
अमिताभ बच्चन यांची नात नव्याला डेट करतोय सिद्धांत चतुर्वेदी? पहिल्यांदाच केला खुलासा

हे देखील वाचा