Monday, July 15, 2024

जे नव्हतं सांगायचं, तेच सांगून बसली शहनाज गिल; म्हणाली, ‘या’ व्यक्तीला सतत करते सोशल मीडियावर स्टॉक

छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम करून बॉलिवूड अभिनेत्रीसारखी प्रसिद्धी मिळवणं म्हणजे सोप्पं काम नाही. मात्र, हे काम अभिनेत्री शहनाज गिल हिने करून दाखवलंय. शहनाजने ‘बिग बॉस 13’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. शोमध्ये असतानाच तिने चांगली प्रसिद्ध मिळवली होती. आज ती कोट्यवधी चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. ती पंजाबी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होतीच, पण आता ती बॉलिवूडमध्येही तिचा जलवा दाखवत आहे.

ती सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे. तसेच, तिच्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. मंगळवारी (दि. 30 ऑगस्ट) मुंबईत फिल्मफेअर पुरस्कार 2022चे (FilmFare Awards 2022) आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने पहिल्यांदा रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. यादरम्यान तिने स्पष्ट केले होते की, ती स्वत:चीच आवडती आहे.

स्वत:ला स्टॉक करते शहनाज गिल
माध्यमांशी बोलताना शहनाज गिल हिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष म्हणजे, तिने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ही फक्त तिच्याशी संबंधित होते. तिने तिचा आवडता इमोजी स्माईल असल्याचे सांगितले. तसेच, जेव्हा तिला विचारले गेले की, ती सोशल मीडियावर कोणाला सर्वाधिक स्टॉक करते? यावर तिने उत्तर देत सांगितले की, ती स्वत:लाच स्टॉक (Shehnaaz Gill Stalk Herself) करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

यानंतर तिने सांगितले की, तिचे सोशल मीडिया कोण हँडल करते. ती म्हणाली की, कधीकधी ती स्वत:च तिचे फोटो पोस्ट करते, तर कधी तिची टीम. हे सर्व तिच्या मूडवर अवलंबून असते. शेवटी तिने सांगितले की, तिच्यावर अजूनही ‘कुत्ता टॉमी’ रीलची क्रेझ कायम आहे. हे तिने ‘बिग बॉस 13’मध्ये म्हटले होते आणि तो ट्रेंड बनला होता.

पांढऱ्या साडीत दाखवला जलवा
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शहनाज गिल हिने साडी परिधान केली होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्या साडीच्या काठावर धागे आणि मोत्यांची सांगड घालण्यात आली होती. अभिनेत्रीने साडीसोबत स्टायलिश ब्लाऊजही परिधान केला होता. याव्यतिरिक्त तिने फक्त कानातले घालत तिचा लूक पूर्ण केला होता. तसेच, तिचा मिनिमल मेकअप आणि सरळ केस तिच्या सुंदरतेत भर घालत होते.

शहनाज गिलचे आगामी सिनेमे
अभिनेत्री शहनाज गिल हिने नुकतेच तिच्या ‘100%’ या सिनेमाची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त ती सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दारा सिंग यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? बनलाय सुपरस्टार, एका सिनेमातून छापतो 100 कोटी
रणबीरच्या ‘या’ 5 चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई, ‘ब्रह्मास्त्र’ मोडेल का रेकॉर्ड?
आगमन गणपत्ती बाप्पांचं! ‘ही’ गाणी वाजलीच पाहिजेत

हे देखील वाचा