हॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी अभिनेत्री एंजेलिना जोली हिच्याबद्दल आहे. एंजेलिना हिने एक्स पती आणि दिग्गज अभिनेता ब्रॅड पिट याच्यावर फसवणुकीचा आणि चोरीचा आरोप लावला आहे. एंजेलिनाच्या कंपनीने ब्रॅड पिटवर 250 मिलियन अमेरिकन डॉलरचा (जवळपास १९ अब्ज रुपये) खटला दाखल केला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एंजेलिना जोली (Angelina Jolie) हिची माजी कंपनी नोव्हेल एलएलसीने म्हटले की, ब्रॅडने एंजेलिनाकडून तिचा फ्रेंच वाईनचा व्यवसाय ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने संपत्ती गुपचूप त्याच्या मित्रांमध्ये आणि काही व्हॅनिटी प्रोजेक्ट्समध्ये ट्रान्सफर केली आहे.
एंजेलिना आणि ब्रॅड पिट (Brad Pitt) यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2014मध्ये लग्नबंधनात अडकले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांमध्ये मतभेद आणि संघर्ष वाढल्याने सन 2016मध्ये दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. रिलेशनशिपमध्ये असताना लग्नानंतर दोघेही 6 बाळांचे आई-वडील बनले आहेत.
कंपनीने ब्रॅड पिटवर संसाधने चोरल्याचा आरोप लावला आहे. कंपनीने सांगितले की, स्विमिंग पूलसाठी 1 मिलियन अमेरिकन डॉलर आणि एक रेकॉर्डिंग स्टुडिओसाठी यापेक्षा जास्त रुपये चोरण्यात आले आहेत. दुसरीकडे, ब्रॅड पिटनेही एंजेलिनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याने म्हटले की, नोव्हेल एलएलसीने दाखल केलेली क्रॉस-तक्रार कायदेशीर सूड असल्याचे दिसते.
ब्रॅड पिटने एंजेलिनावर लावला आरोप
ब्रॅड पिट म्हणाला की, एंजेलिनाने आपले शेअर्स बेकायदेशीरपणे शॅटो मिरावल या वाईन कंपनीला विकले होते. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, एंजेलिनाने मिरावलच्या शेअर्सवरही ताबा मिळवला होता. मात्र, नंतर 2021मध्ये सर्वात मोठी पेय कंपनी स्टोलीला हे शेअर्स विकले होते. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ब्रॅडने मिरावल कंपनीवर ताबा मिळवण्यासाठी कंपनीची मालमत्ता आपल्या मित्रांमध्ये आणि इतर कंपन्यांना हस्तांतरित केली होती.
सध्या हे प्रकरण चांगलेच तापले आहे. याबद्दल पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्णा अभिषेक देखील दिला डच्चू
पंजाबी सिंगर हनीसिंग आणि पत्नी शालिनीचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची संपत्ती
समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला ‘यशोदा’चा ट्रेलर आला समोर