ब्रँड पिट (Brad Pitt) ने त्याची माजी पत्नी असलेल्या एंजेलिना जोली (Angelina Jolie) च्या विरोधात केस केली आहे. या केसचे कारण म्हणजे, एंजेलिनाने काही महिन्यांपूर्वी केलेली एक बिजनेस डील. ५८ वर्षीय ब्रँड पिटने त्याच्या माजी पत्नी असलेल्या एंजेलिना जोलीने चेटो मिरावल (Chateau Miraval) कंपनीमधील आपला हिस्सा अवैध पद्धतीने विकला. त्यांच्यात असे ठरले होते की, ते दोघं हा हिस्सा एकमेकांच्या सहमतीशिवाय विकणार नाही, पण असे असूनही एंजेलिनाने तिचा हिस्सा परस्पर विकला.
एका मोठ्या रिपोर्टनुसार ब्रँड पिटने आणि एंजेलिना जोलीने २०१४ साली लग्न केले आणि २०१९ साली त्या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांनी २००८ साली फ्रांसिसी कंपनी असलेल्या चेटो मिरावलमध्ये हिस्सेदारी खरेदी केली होती. ज्यात आलिशान घर आणि वायनरी देखील समाविष्ट होती. आज भलेही ब्रँड आणि एंजेलिना यांचा घटस्फोट झाला असला, तरी आजही या दोघांमध्ये संपत्तीला घेऊन कायदेशीर लढाई चालू आहे.

या वायनरीमधून दोघांची खूपच चांगली कमाई होत होती. त्यामुळेच त्यांनी असे ठरवले होते की, एकमेकांच्या परवानगीशिवाय कोणीही आपला हिस्सा विकणार नाही. ब्रँडने आता त्याच्या तक्रारीत सांगितले आहे की, एंजेलिनाने मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कोणतीही कल्पना न देता तिचा या कंपनीतील हिस्सा विकला आहे. त्यासाठीच त्याने तिच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे. त्याने असे सांगितले आहे की, कोर्टाने या विक्रीला अवैध घोषित करावे.
ही वायनरी ब्रँड पिटचा पॅशन प्रोजेक्ट असून, त्याच्या इनकमचा मुख्य स्रोत देखील आहे. मागील काही वर्षांमध्ये या वायनरीपासून मिळणाऱ्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा झाला आहे. ब्रँडने एंजेलिना वर त्याला न सांगून हिस्सा विकल्याचे चुकीचे केल्याचे म्हटले आहे. तो याविरोधात आवाज उठवणार आणि त्याला विश्वास आहे की, कोर्टात त्याला न्याय मिळणार आहे.
हेही वाचा :
- दिशा पटानी उचलले ८० किलोचे वजन, टायगर श्रॉफच्या बहिणीसोबत आईनेही केले तोंड भरून कौतुक
- Happy Birthday : एक चूक पडली महागात आणि जिया मानेकला सोडावी लागली ‘साथ निभाना साथीया’ मालिका
- Birth anniversary : असे काय झाले होते की, निम्मी ओळखल्या जात होत्या ‘अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’