अभिनेता रितेश देशमुख, वरुण शर्मा आणि कुशा कपिला यांचा शो ‘केस तो बनता है’ चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येतात, ज्यांच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचे आरोप केले जातात आणि त्यांची खूप खिल्ली उडवली जाते. शोमध्ये एका बाजूचा वकील रितेश असतो, तर दुसऱ्या बाजूचा वकील वरुण आणि जजच्या भूमिकेत कुशा दिसते. अशातच, करण जोहर नुकताच शोमध्ये पोहोचला. दरम्यान, शोमध्ये त्याच्यासोबत खूप टिंगल- टवाळक्या करण्यात आली. त्यादरम्यान, करण म्हणाला की, कधीकधी तो एखाद्या अभिनेत्यामध्ये टॅलेंट शोधतो परंतु तो मिळत नाही.
करण जोहर (Karan Johar) बॉलिवूड आणि नेपोटिझम या मुद्द्यामुळे कायमच चर्चेत असतो. करणबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की, तो स्टार मुलांना संधी देतो आणि त्यांना प्रमोट करतो. अशातच अलीकडे करण ऍमेझॉन मिनी टीव्हीवरील ‘केस तो बनाना है’ (Case Toh Banta Hai) या शोमध्ये पोहोचला. यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यावर तोच आरोप करण्यात आला. यावेळी शोमध्ये रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) वकिलाच्या भूमिकेत करणवर आरोप केले आणि खूप मस्ती केली.
शोमध्ये रितेश करण जोहरला बोलला की, “मला सांग की, जेव्हा तुम्ही एखाद्या अभिनेत्याला कास्ट करता, तेव्हा तुम्ही काय बघता- चांगला लूक, चांगला लूक आणि चांगला लूक.” यावर करण जोहर प्रतिक्रिया देत म्हणतो, “मी मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजनच पाहतो.” कधी कधी मला टॅलेंट, टॅलेंट आणि टॅलेंटच दिसतात, पण ते कधीच मिळत नाहीत.” या वक्तव्यानंतर करण जोहर चांगलाच चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
सध्या करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’या चॅट शोमुळे चर्चेत आहे. यापूर्वीही या शोशी संबंधित अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. हा सीझन खूप पसंत केला जात असताना, प्रत्येक एपिसोडमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने आलियाचा उल्लेख केला जात आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे, करण जोहर त्याच्या बेफिकीर शैलीमुळे अनेकदा चर्चेत असतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कार्तिक आर्यनच्या करिअरची गाडी एकदम सुसाट! ‘या’ आगामी चित्रपटांची भलीमोठी यादी एकदा पहाच
विकी कौशलने कॅटरिनासोबत केले ‘असे’ काही की; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘नक्की काय करायचं बाबा’
‘हे’ आहेत फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडे घटस्फोट, सुपरस्टारची बायको एका झटक्यात बनली 380 कोटींची मालकीण