Sunday, May 19, 2024

‘हे’ आहेत फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडे घटस्फोट, सुपरस्टारची बायको एका झटक्यात बनली 380 कोटींची मालकीण

रॅपर यो यो हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हातील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली. हनी सिंगच्या पत्नीने गायकावर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासोबतच कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध ठेवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्याच्या पत्नीने पोटगी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती, पण नंतर दोघांमध्ये 1 कोटी रुपयांवर वाद मिटला. हनी सिंगच्या आधीही बॉलिवूडचे असे अनेक प्रसिद्ध जोडपे आहेत, जे घटस्फोटामुळे चर्चेत होते. त्यांचे घटस्फोट खूप महागडे ठरलेत. चला तर बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित घटस्फोटाबद्दल जाणून घेऊया…

ऋतिक रोशन- सुझेन खान
ऋतिक रोशन आणि सुझेन खान यांचा घटस्फोट देशभरात चर्चेचा विषय होता. दोघे 2000मध्ये लग्न बंधनात अडकले होते. मात्र, 2013 मध्ये अफेअरच्या चर्चेदरम्यान दोघांचा घटस्फोट झाला. ऋतिक आणि सुझेनचा घटस्फोट हा देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये गणला जातो. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुझेनने ऋतिककडून 400 कोटी रुपये मागितले होते, पण ऋतिकने तिला 380 कोटी रुपये दिले होते.

करिश्मा कपूर- संजय कपूर
प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील लग्नाच्या 11 वर्षानंतर 2014 मध्ये घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 2016 साली दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. घटस्फोटादरम्यान करिश्मा आणि तिचा पती संजय यांच्यात 14 कोटी रुपयांचा करार झाला होता. ज्या अंतर्गत बिझनेसमन संजय करिश्माला दर महिन्याला 10 लाख रुपये देतो, जे त्यांच्या दोन मुलांच्या संगोपनासाठी खर्च होतात.

मलायका अरोरा- अरबाज खान
मलायका अरोरा आणि अरबाज खान हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हॉट कपल्समध्ये गणले जायचे. त्यामुळे दोघांचा घटस्फोट चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होता. या दोघांनी 1988 मध्ये लग्न केले होते. मात्र, दोघांनीही लग्नाच्या 19 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पोटगी म्हणून मलायका अरोराने अरबाजकडून 15 कोटी रुपयांची मागणी केली होती, जी अरबाजने नाकारली होती.

आमिर खान- रीना दत्ता
आमिर खानने 1986 साली आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन पत्नी रीना दत्ताशी लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, आमिर खानने रीनाला 50 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून देखील घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर 2019 मध्ये आमिर आणि किरणने अचानक घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

सैफ अली खान-अमृता सिंह
अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये स्वतःहून 13 वर्षे मोठ्या अमृता सिंगसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, घटस्फोटादरम्यान 5 कोटी रुपयांची पोटगी निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी 2.5 कोटी रुपये त्याने दिले. यासोबतच मुलांची काळजी घेण्यासाठी अमृताला दरमहा एक लाख रुपयेही दिले जातात.

धनुष- ऐश्वर्या
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुष आणि ऐश्वर्या यांचाही घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 18 वर्षांनंतर जेव्हा या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे होण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना विश्वास बसला नाही. कारण लग्नापूर्वी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, आता धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पोपटलालला मिळेना बायको, पण शोमधील ‘हा’ कलाकार साखरपुडा होऊनही अनेक वर्षांपासून अविवाहित
‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण
रितेश देशमुखने अभिनेता करण जोहरला खेचले कोर्टात, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा