Tuesday, September 8, 2026
Home बॉलीवूड पंचायत 5च्या रिलीजबाबत मोठी अपडेट, या सीजनमध्ये फुलेराची कथा घेणार नवं वळण

पंचायत 5च्या रिलीजबाबत मोठी अपडेट, या सीजनमध्ये फुलेराची कथा घेणार नवं वळण

ओटीटी विश्वात अनेक सिरीज गाजल्या त्यातीलच एक म्हणजे पंचायत. या वेब सीरीजचा पुढचा सीझन पुन्हा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या सिरीजने अनेक प्रेक्षकांची मने जिकंली आहे. अगदी साधी आणि आपलीशी वाटणारी कथा असल्याने प्रेक्षकांनचा याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तर या सीरीजचे 4 सीझन प्रदर्शित असुन याचा 5 सिझनची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आणि याबाबत आता एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. ज्यामुळे चाहत्याना एक दिलासा मिळु शकतो.

गेल्या काही काळापासुन पंचायत 5च्या रिलिज डेटच्या तारखाबाबत आंदाज लावले जात आहेत. काही वृतांनुसार या सीरीजचा 5 सीजन जुन किंवा जुलैमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध होऊ शकतो. असा दावा करण्यात आला होता. मात्र ही सीरीज या महिन्यात रीलीज झाली नाही, तर या सिरिजचे दिग्दर्शक दिपक (deepak)कुमार मिश्रा यांनी स्वत: सीझन 5च्या प्रदर्शनाबाबतची परिस्थिती स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी म्हणले आहे की, पोस्ट प्राॅडक्शने काम सध्या सुरु आहे. मात्र या सीजनची कोणतीही तारीख निश्चित केली नाही. मात्र त्यांनी असे संकेत दिले आहेत की, पंचायत 5 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 च्या सुमारास पोहचु शकते. त्यामुळे यावरुन असे समजते की, या सीजन आता जास्त वाट पाहावी लागणार नाही.

पंंचायत ही सिरीज एका गावातील अडटणी, राजकारण , नातेसंबंध या साऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे. दिग्दर्शकाच्या मते, चौथ्या सीझनमध्ये दाखवलेल्या पंचायत निवडणुका आता संपल्या आहेत आणि प्रधानाचा पराभव झाला आहे. त्यामुळे, या पराभवानंतर त्यांच्या आयुष्याला कोणती दिशा मिळते, हा पाचव्या सीझनमधील कथेचा एक महत्त्वाचा भाग असेल. त्यामुळे अनेकजन या सीजनची वाट पाहत आहेत.

हेही वाचा

‘मिर्झापूर द मुव्ही’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

हे देखील वाचा