Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मित्र कृष्णा मुखर्जीच्या साखरपुड्याच्या बेभान होऊन नाचला अली गोनी, व्हिडिओ व्हायरल

टीव्ही कार्यक्रमामधील अभिनेत्री कृष्णा मुखर्जी ने आपल्या बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालासोबत खाजगी पद्धतीने साखरपुडा केला आहे. तिने टीव्ही कार्यक्रमात अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तिने आपल्या साखरपुड्यात आपल्या कुटुंबासोबत काही जवळच्या मित्रांनाही बोलवले होते. या कार्यक्रमामध्ये अली गोनी आणि त्याची गर्लफ्रेंड टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन यांनीही हजेरी लावली लावली होती. या कार्यक्रामामध्ये अली गोनी याचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जाणून घेऊया पुर्ण माहिती.

‘ये है मोहोब्बते’ या सिरियलमधून ‘आलिया’ या भुमिकेमुळे आपली ओळख निर्माण करणारी कृष्णा मुखर्जी(krishna Mukherjee)  हिने मनाली सारख्या सुंदर ठिकाणी आपल्या बॉयफ्रेंड चिराग बाटलीवला(Chirag Batliwala) सोबत खाजगी पद्धतीने साखरपुडा केला आहे. यामध्ये तिच्या जवळचे कुटुंब, सेलिब्रिटीं आणि मित्रांनाही बोलवले होते. यासोबतच अली गोनी(Aly Goni) आणि अभिनेत्री जॅस्मिन भसीन(Jasmin Bhasin) या जोडप्यानेही हजेरी लावली होती. आपल्या मैत्रीनीचे लग्न म्हणल्यावर अली गोनीने चांगलीच धमाल केली आणि सध्या ट्रेंड असलेलं ‘काला चश्मा’ या गाण्यावर धमाकेदार डांन्स केला असुन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अली गोनीने काला चश्मावर केले हुक स्टेप
अली गोनीने साखरपुड्याचे सुंदर फोटो आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले असून पॅपराजी विरल भयानी यांच्याकडून एक डान्स व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कृष्णाच्या साखरपुड्यामध्ये अली गोनीने ‘काला चश्मा’ या गाण्यावर हुक स्टेप करत धमाकेदार डान्स केला आहे. त्याच्यासोबत कृष्णाचा होणारा नवरा आणि बाकीचे कुटुंबीय नाचताना दिसत आहे. अलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे.

चिराग बाटलीवाला सोबत कृष्णा मुखर्जीची लव लाइफ
अनेक कार्यक्रमात काम करणारी कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवला याची पहिली भेट 2021 मध्ये एक म्युचुअल फ्रेंडद्वारे झाली होती. चिराग हा ‘मार्चेंट नेवी’ मध्ये काम करत आहे. जे्व्हा कृष्णाने पहिल्यांदा चिरागला त्याच्या युनिफॉर्ममध्ये पाहिले होते, तेव्हा तो एका नजरेतच त्याच्या प्रेमात पडला. नेवी युनिफॉर्मचा रंग पांढरा असल्याने  साखरपुड्याची थीम देखील पांढऱ्या रंगाची ठेवली होती. साखरपुड्यामध्ये कृष्णाने पांढऱ्या रंगाचा शोल्डर गाउन घातला होता आणि चिरागने आपला नेवीचा युनिफॉर्म घातला होता ते दोघेही खूपच सुंदर दिसत होते.माहितीनुसार असे समोर आले आहे की, कृष्णा आणि चिराग पुढच्या वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
अनुपम खेरप्रमाणे भाऊ राजू खेर यांना मिळवता आले नाही नाव, सहाय्यक भूमिकांसाठी होते प्रसिद्ध
यशराजच्या चित्रपटातून पदार्पण करूनही मिळालं नाही यश, आता पतीसोबत ट्युलिप जोशी सांभाळतेय करोडोंची कंपनी
अनिल कपूरांच्या लेकीला 1 वर्षाआधीच बनायचं होतं आई, पण कोणत्या कारणामुळे बदलावा लागला निर्णय?

हे देखील वाचा