Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली

‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली

टीव्ही जगातील नामांकित अभिनेत्री निया शर्मा तिच्या अभिनयामुळे कमी आणि बोल्ड स्टाईलमुळे जास्त चर्चेत असते. निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोने ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. बोल्ड फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधणारी निया आता तिच्या डान्सद्वारे चाहत्यांची मनं जिंकत आहे. परंतु याच डान्समुळे तिला ट्रोलही करण्यात आले आहे.

नुकताच नियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जोरदार स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती हनी सिंगच्या ‘सैयां जी’ या गाण्यावर ठुमके लावत नुसरत भरुचाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. पण याबरोबरच तिने स्वत: ला डान्स जमत नसल्याचेही उघड केले आहे.

व्हिडिओ शेअर करताना नियाने लिहिले, “म्हणले होते जाऊ दे, जाऊ दे, पण सचिन जिगरने नाही ऐकलं. डान्स हा माझ्यासाठी नाही.”

व्हिडिओ पाहिल्यानंतर बर्‍याच युजर्सनी नियाच्या डान्स कौशल्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. त्याचवेळी, बऱ्याच जणांनी तिच्या डान्स मुव्हसाठी तिला ट्रोलही केलंय. एकाने लिहिले, “मजा नाही आली ताई.” त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले, “अगदी बरोबर सांगितले, डान्स ही तुमची गोष्ट नाही.”

पण या सर्व ट्रोलनंतरही नियाच्या व्हिडिओवरील लाईक्सचा पाऊस कमी झालेला नाही. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाख 29 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये नियाच्या डान्सशिवाय तिचा नेहमीप्रमाणेच बोल्ड अंदाजही पाहायला आहे.

नियाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर नियाने ‘काली’ या मालिकेतून टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते. यानंतर निया शर्मा ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेत दिसली. ज्यामुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. नंतर ‘जमाई राजा’ मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत ती रवी दुबेसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-वडिलांच्या निधनानंतर बहिणीला बसला होता मोठा धक्का, असा वाचवला होता तिचा जीव; किंग खानचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा