भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

singh new song kuware se pavittar baani hits internet bhojpuri south ditish


भोजपुरी संगीत उद्योगातील सुपरस्टार असलेल्या राकेश मिश्राला कोणत्याही परिचयाची गरज नाही. इंडस्ट्रीत त्याची धमाल सुरूच असते. नुकतेच त्याचे ‘कुंवारे से पवित्तर बानी’ हे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. रिलीझ होताच गाण्याने यूट्यूबवर धमाल करण्यास सुरुवात केली आहे.

राकेश मिश्राचे हे नवे गाणे म्युझिक वाईडच्या यूट्यूब चॅनलवरून रिलीझ करण्यात आले आहे. या गाण्यात राकेश मिश्रासोबत महिमा सिंग दिसली आहे. नेहमीप्रमाणे या दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. गाण्याला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

हे गाणे राकेश मिश्रा यांनी गायले आहे. तसेच, पवन पांडे यांनी हे गाणे लिहिले असून संगीत प्रियांशु सिंग यांचे आहे. गाण्याला सिंटू मेहता यांनी कोरिओग्राफ केले आहे, तर व्हिडिओ पंकज सोनी यांनी दिग्दर्शित केला आहे.

यापूर्वी राकेश मिश्राचे ‘खेला भऊजी होली’ आणि ‘पउआ ना समझो बोतल का मजा’ हे गाणेही रिलीझ होताच व्हायरल झाले होते. या गाण्याने एकाच दिवसात 1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूजचा आकडा ओलांडला होता.

नुकतेच, रिलीझ झालेल्या गाण्यात राकेश रुसलेला असतो, तर महिमा त्याला समजवण्यासाठी सर्व प्रयत्न करताना दिसतेय. यात रुसवा घालवतानाचा रोमान्स प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. चाहत्यांनी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याव्यतिरिक्त या दिवसात राकेश मिश्रा भोजपुरी संगीत रसिकांच्या मनात घर करत आहेत. यामुळेच त्याचे प्रत्येक गाणे अगदी थोड्याच वेळात मिलियनचा टप्पा गाठत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओये होये होये!’ जस्सी गिलच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; चहलच्या पत्नीनेही लावले ठुमके

-‘अरे कोणीतरी एसी लावा रे’, मलायका आणि नोराचा डान्स पाहून टेरेन्सचे वक्तव्य, तुम्हीही पाहा हॉट व्हिडिओ

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.