Friday, November 15, 2024
Home बॉलीवूड आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

हरियाणवी डान्सर सपना चौधरी सतत वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज शो करत असते. सपना तिच्या परफॉर्मन्सद्वारे प्रेक्षकांना नाचण्यास भाग पाडते. तिचा प्रत्येक डान्स शो पाहण्यासाठी हजारो लोक जमतात. सपनाची क्रेझ फक्त हरियाणामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. सपनाची गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. सध्या ‘नानू की जानू’ चित्रपटाचा ‘तेरे ठुमके सपना चौधरी’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हरियाणाच्या डान्सिंग क्वीन सपना चौधरीच्या ‘तेरे ठुमके सपना चौधरी’ गाण्याला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. ‘नानू की जानू’ हा बॉलिवूड अभिनेता अभय देओल आणि अभिनेत्री पत्रलेखाचा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. जरी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही खास करू शकला नाही, तरी सपनाचे हे गाणे खूपच पसंत केले गेले आहे. सपनाच्या डान्समुळे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या जिभेवर आहे.

हे गाणे 3 वर्षांपूर्वी टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते. या गाण्याला आतापर्यंत 3 कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

साजिद कुरेशी यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज हैदर यांनी केले आहे. ‘तेरे ठुमके सपना चौधरी’ या गाण्याला गुनवंत सेन, खुशबू जैन आणि सौम्य उपाध्याय यांनी आवाज दिला आहे. गीत आबिद अली यांनी दिले आहेत. मात्र, सपनाचे सर्वात प्रसिद्ध गाणे ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी जबरदस्त आहे की प्रत्येक विवाह सोहळ्यात लोक या गाण्यावर नाचताना दिसतात.

हरियाणाच्या रोहतकमध्ये जन्मलेल्या सपना चौधरीचे लाखो चाहते आहेत. सपना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. हरियाणा व्यतिरिक्त सपना दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर बर्‍याच ठिकाणी सतत कार्यक्रम करत असते. सपना तिच्या डान्समुळे प्रसिद्ध आहे पण बिग बॉस शोने तिला अधिक प्रसिद्ध केले. बिग बॉस सीझन 11 मध्ये भाग घेतल्यानंतर सपनाची लोकप्रियता प्रचंड वाढली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओये होये होये!’ जस्सी गिलच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; चहलच्या पत्नीनेही लावले ठुमके

-‘अरे कोणीतरी एसी लावा रे’, मलायका आणि नोराचा डान्स पाहून टेरेन्सचे वक्तव्य, तुम्हीही पाहा हॉट व्हिडिओ

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा