टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ओळखला जाताे. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शाेमधील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तसं पाहिलं, तर या यादीत बऱ्याच कलाकारांचे नाव आहे. मात्र, ‘बबीताजी’चा जेठालाल पेक्षा खूप जास्त तरूण चाहतावर्ग आहे, ज्यांची बबीताजी क्रश आहे.
‘बबीताजी’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) साेशल मीडियावर फार सक्रिय असून ती कायमच तिचे फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करते. मात्र, अनेकदा तिला ट्रोलर्सच्या रोषाला समाेरे जावे लागते. अशातच तिच्या एका पाेस्टवर अपमानास्पद कमेंट करण्यात आली आहे.
झाले असे की, मुनमुनने भारतीय पाेशाखात एक पाेस्ट शेअर केली हाेती. हा फाेटाे लाखाे लाेकांच्या पसंतीस उतरला. मात्र, एक व्यक्तीने कमेंट बाॅक्समध्ये सर्व सीमा ओलांडल्या आणि कमेंट करत लिहिले की, “तुझी एका रात्रीची किंमत काय?” दुसरी काेणती अभिनेत्री असती, तर दुर्लक्ष केले असते. कारण, तसं पाहिलं, तर प्रत्येक दुसरा युजर त्यांच्या कमेंट बाॅक्समध्ये अशा काही विचित्र कमेंट करताना दिसताे. मात्र, मुनमुन अशाप्रकारे अपमान सहन करणाऱ्यांपैकी नाही. तिला अशा प्रकारची ट्रोलिंग अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिने त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर दिले.
मुनमुन दत्ता अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने 2004 मध्ये ‘हम सब बाराती’ या शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर कमल हासन (Kamal Haasan) यांचा 2005 साली आलेला चित्रपट ‘मुंबई एक्सप्रेस’मध्ये काम केले होते. याशिवाय मुनमुन दत्ताने पूजा भट्ट (Pooja Bhatt) दिग्दर्शित ‘हॉलिडे’ चित्रपटातही काम केले आहे. हा चित्रपट 2006 साली आला होता. 2018 मध्ये तिने ‘द लिटिल देवी’ या चित्रपटातूनही तिने धमाल केली होती. या सर्वांशिवाय मुनमुनने ‘मुन गांधी नुहेन’ आणि ‘अमर आकाश मेघ ब्रिष्टी’ या दोन बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! दीपिका आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तिच्याइतकी संपत्ती कुठल्याच ऍक्ट्रेसकडे नाही
कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा
हुमा कुरेशीला आवडत नाहीत अभिनेते? ‘ही’ अभिनेत्री आहे तिची क्रश, स्वत:च केला खुलासा