बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन या अभिनेत्रीने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने अभिनय क्षेत्रात आपल्य करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटामधून केली होती. यानंतर तिने 2003 साली हिंदी इंडस्ट्रीमध्ये ‘हंगामा’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. आज ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी नेहमी तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे ती चर्चेत असते. आज बुधवार ( दि. 21 सप्टेंबर) या दिवशी रिमी सेन आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या खास दिवशी तिच्या आयुष्यातील याच वर्षीचा सगळ्यात जास्त गाजलेला किस्सा सांगणार आहेत ज्यामुळे रिमी चांगलीच चर्चेत आली होती.
‘बागबान'(Baghban),’हंगामा'(Hungama) आणि ‘धूम'(Dhum) सारख्या गाजलेल्य चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री रिमी सेन ( Rimi Sen) हिचा आज 41 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रिमा सेनचा जन्म 21 सप्टेंबर पश्चिम बंगाल येथे झाला होता. रिमी सेन सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. नवनवीन पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला होता ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती.
झाले असे की, रिमी एका जिममध्ये जात होती, तेव्हा तिथे तिला एक व्यक्ती भेटला जो हळूहळू रिमाचा चांगलाच मित्र झाला होता. माध्यमातील वृत्तानुसार, त्या व्यक्तीचे नाव रौनक होते आणि या व्यक्तीने तिला आपल्या गोष्टीच्या जाळ्यामध्ये अडकवले आणि फेब्रुवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 पर्यत जवळपास 4.14 कोटी रुपये एक खोटं आश्वासन देऊन घेतले की, ‘तिचा पैसा एका व्यवसायामध्ये गुंतवणूकीसाठी वापरत आहे आणि याच्या बदल्यात तिला 30 ते 40 टक्क्याने पैसे परत मिळतील.’ रिमी सेनला वाटले की, हा व्यवहार योग्य आहे. पण काही दिवसांनी तिला गडबड असल्याचे जानवले आणि तिने माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर तिला समजले की, तिच्यासोबत फ्रॉड झाला आहे.
View this post on Instagram
रिमी सेन याच्या आधीही खूप वेळा चर्चेत आली आहे. ती बिग बॉस 9 चाही भाग बनली होती. मात्र, या कार्यक्रमामध्ये तिला फक्त 49 दिवसांसाठीच पहाता आलं. पण बिग बॉस 9 या कार्यक्रमाचा भाग बनण्यासाठी 2.25 कोटी रुपये एवढे मानधन देण्यात आले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती फक्त पैशासाठी या कार्यक्रमाचा भाग बनली होते. अभिनेत्रीने सांगितले की, “आयुष्यामध्ये कधी कधी काही कामे नावासाठी केली जातात तर, काही पैशासाठी केली जातात, बिग बॉस हा कार्यक्रम मी पैशासाठीच केला होता.” रिमी मुंबईमध्ये स्वत:चे प्रोडक्शन हाउसही चालवत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’
पडद्यावर शाहरुखला मारणे जेव्हा गुलशन ग्रोव्हरला खऱ्या आयुष्यात पडले महागात!
अबब! चाळीशी पार केलेली करिना आहे इतक्या कोटींची मालकीण, लाखोंच्या बॅग्सची करते खरेदी