अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)’सौगंध’ या डेब्यू चित्रपटात दिसलेली सुंदर अभिनेत्री तुम्हाला आठवते का? सुंदर स्मित आणि मोठे डोळे असलेल्या या अभिनेत्रीचा गुरूवार (22 सप्टेंबर) वाढदिवस आहे. योगायोगाने ‘सौगंध’ हा देखील शांतीप्रियाचा पहिला हिंदी चित्रपट होता. यापूर्वी तिने साऊथ सिनेसृष्टीत आपले नाव उज्ज्वल केले होते. ‘सौगंध’मध्ये खिलाडी कुमार आणि शांतीप्रियाची जोडी खूप गाजली. यानंतर शांतीप्रियाने पुन्हा काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, पण ‘सौगंध’सारखी जादू निर्माण करू शकली नाही. त्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. मात्र, यावर्षी ती पुन्हा रुपेरी पडद्यावर परतणार असल्याची बातमी आली. आज शांतीप्रिया यांचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
शांतिप्रिया यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६९ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. शांतीप्रियाने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीपूर्वी तिने साऊथ इंडस्ट्रीत काम केले. शांतीप्रियाने 1987 मध्ये ‘एंगा ओरू पातुकरण’ या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये 24 हून अधिक चित्रपट केले. शांतीप्रिया हे तमिळ चित्रपट जगतातील एक मोठे नाव होते. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत iakshay kumar) हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ‘सौगंध’ चित्रपट केला. पहिल्याच चित्रपटात शांतीप्रियाची जादू चालली. पण, ती इंडस्ट्रीत जास्त काळ टिकू शकली नाही. शांतीप्रियाने 1994 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर चित्रपट सोडल्यानंतर 1999 मध्ये अभिनेता सिद्धार्थ रेसोबत लग्न केले.
‘सौगंध’ नंतर शांतिप्रियाने ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘फूल और अंगार’ आणि ‘मेहरबान’ या चित्रपटांमध्ये काम केले. या सर्व चित्रपटांमध्ये ती मिथुन चक्रवर्तीसोबत दिसली होती. याशिवाय तिने सनी देओलसोबत ‘वीरता’ चित्रपटात काम केले होते. ती शेवटची ‘इक्के पे इक्का’ चित्रपटात दिसली होती. अक्षय कुमारसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शांतीप्रियाने पडद्यापासून दूर जाण्यापूर्वी तिचा शेवटचा चित्रपट ‘इक्के पे इक्का’ अक्षय कुमारसोबत केला होता. अभिनय जग सोडून शांतीप्रिया कौटुंबिक जीवनात व्यस्त झाली. पण अचानक तिच्या आयुष्यात भूकंप आला. अभिनेत्रीचे पती सिद्धार्थ रे यांचे 2004 मध्ये निधन झाले. तिला दोन मुलगे आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांतीप्रियावर पडली, जी तिने चोख बजावली.
त्याच वर्षी शांतीप्रियाबद्दल बातमी आली की, ती पुन्हा अभिनयाच्या जगात कमबॅक करणार आहे. याशिवाय ती प्रसिद्ध कोरिओग्राफर संदीप सोपरकर यांच्यासोबत खूप वेळ घालवत असल्याची बातमीही आली होती. रिपोर्ट्सनुसार, शांतीप्रिया आणि संदीप सोपरकर या वर्षी एप्रिल महिन्यात एका डान्स इव्हेंटमध्ये भेटले होते आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. शांतीप्रिया यांचे दिवंगत पती सिद्धार्थ रे हे मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते होते. शाहरुख खान आणि काजोल यांच्या बाजीगर या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2004 मध्ये वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. तेव्हापासून शांतीप्रियाचे आयुष्य एकाकीपणात जात होते. त्याच वेळी, कोरिओग्राफर संदीप सोपरकर यांनी 2009 मध्ये मॉडेल जेसी रंधावासोबत लग्न केले होते. दोघांनी 2016 मध्ये परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजूंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांना समजलेली हैराण करणारी गोष्ट, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’










