Friday, April 19, 2024

सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल

काही वर्षांपूर्वी करीना कपूर आणि शाहिद कपूर हे टिनसेल्टाऊनच्या सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक मानले जात होते. दाेघे अनेकदा एकमेंकाचा हात पकडताना स्पाॅट झाले हाेते. याव्यतिरिक्त करीनाने अनेकदा शाहिद साेबतच्या नात्याला अधिकृत केले हाेते. मात्र, काही कारणास्तव दाेघांनी आपले चार वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला, ज्याने चाहत्यांना चांगलाच धक्क बसला होता. आज करीना आणि शाहिद आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र, आजही त्या दाेघांचे ब्रेकअप का झाले हे गूढ आहे. आता त्यांचा जुना व्हिडिओ समाेर आला आहे, ज्यात करीनाने सैफ अली खानसमाेर शाहिदला किस केल्याचे दिसत आहे.

चाहत्यांना करीना कपूर (Kareena Kapoor) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री पसंतीस उतरली हाेती. 2007मध्ये दाेघांचे नाते खूप चर्चेत हाेते. झाले असे की, करीनाने 2006मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वज यांच्या ‘ओमकारा’ (Omkara) चित्रपटात ‘डॉली मिश्रा’ची भूमिका साकारली हाेती, जे प्रेक्षकांसाेबत समीक्षकांच्या पसंतीस उतरलं हाेतं. त्यामुळे 2007मध्ये करीनाला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या पुरस्कार साेहळ्यात करीना आपला त्यावेळचा बाॅयफ्रेंड शाहिद कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासाेबत पाेहोचली हाेती. ज्यावेळी रेखा यांनी सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी नाव जाहीर केले, त्यावेळी करीनाने शाहिद आणि बहीण करिश्मा कपूर यांना मिठी मारली. तसेच, मंचावर जाण्याच्या आधी उत्साहाच्या भरात शाहिद कपूरला किस केले. त्यावेळी सैफ अली खान रेखा यांच्यासाेबत मंचावरच उभा हाेता.

असे असलं, तरीही करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2008मध्ये प्रत्येक ठिकाणी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या राेमान्सची चर्चा हाेती. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दाेघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मग चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना 2012मध्ये विवाहबंधनात अडकले. आज करीना आणि सैफला तैमूर आणि जहांगीर ही दाेन मुलं आहे. दुसरीकडे शाहिद कपूरने देखील मीरा राजपूतसाेबत लग्न करून आपला संसार थाटला. शाहिद आणि मीरा हे देखील दाेन मुलांचे आई- वडील आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’
‘पनीर, लोणचं, सलाड, थोडासा बच्चन सगळे एकटे पडले’, राजूंच्या निधनानंतर हेमांगीची भावूक पोस्ट व्हायरल
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’

हे देखील वाचा