Friday, February 3, 2023

राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’

देशातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (21 सप्टेंबर) रोजी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजूंना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. 41 दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बाॅलिवूडपासून ते भाेजपूरी सिनेसृष्टीपर्यंत सर्वांनाचा हादरून साेडले. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने दिग्गज कलाकारांनी दु:ख व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रसिद्ध भाेजपूरी स्टार मनाेज तिवारी (Manoj Tiwari) यांनी राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना श्रद्धांजली वाहत एक पाेस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले की, “लाेक त्याला ‘द काॅमेडी किंग’ने ओळखतात. मात्र, मी तुम्हाला एक सांगू इच्छिताे की, मी त्याला तेव्हापासून ओळखताे जेव्हापासून त्याला हा टॅग मिळायचा हाेता. मी आणि राजू 20 वर्षांपासून जाेडलेलाे आहाेत. आम्ही पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना साेबत भेटलाे. राजूला सर्वांच्या मनावर राज्य कशाप्रकारे करायचे हे माहीत हाेतं आणि त्याने ते केलं. कॉमेडियन हाेण्याच्या नात्याने त्याने प्रत्येक इंडस्ट्रीवर आपली छाप साेडली.”

मनाेज तिवारीसाेबतच रवी किशन यांनीही राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहत लिहिले की, “जीवनातील संघर्षावर प्रत्येक वेळी यश मिळवणारे सर्वोत्तम हास्य कलाकार प्रिय राजू श्रीवास्तव हरवलेत… तुम्ही खूपच संघर्ष केला. माझी तुम्हाला विनम्र श्रद्धांजली.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) यानेदेखील राजू श्रीवास्तव यांच्या आठवणीत लिहिले की, “जगाच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे प्रिय राजू भैय्या आज डाेळ्यात अश्रू देऊन गेले. आता हसायला येईलही, पण तुम्ही नसणार. हा क्षण आहे, पण तुमची साथ नाही. राजू भैय्या इतक्या लवकर का? विनम्र श्रद्धांजली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Khesari Lal Yadav (@khesari_yadav)

अक्षरा सिंग (Akshara Singh) हिने राजू श्रीवास्तव यांचा हसणारा फाेटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जगाला हसवणारे कायमचे शांत झाले.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’नंतर, राजू श्रीवास्तव यांनी प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘बिग बॉस 3’ मध्ये देखील भाग घेतला होता. यानंतर ते कॉमेडी शो ‘महामुकबाला सिझन 6’ आणि ‘नच बलिए’सारख्या शोमध्येही दिसले आहे. ‘नच बलिये’मध्ये राजू श्रीवास्तव पहिल्यांदा पत्नीसोबत दिसले हाेते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘पनीर, लोणचं, सलाड, थोडासा बच्चन सगळे एकटे पडले’, राजूंच्या निधनानंतर हेमांगीची भावूक पोस्ट व्हायरल
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’
अभिनेते महेश ठाकूर यांनी पोलिसांकडे केली तक्रार; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

हे देखील वाचा