Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ओळख लपवण्यासाठी जॅकलिनने घातले ‘तसले’ कपडे, वकिलांच्या घेऱ्यात कोर्टातून बाहेर पडली अभिनेत्री

ओळख लपवण्यासाठी जॅकलिनने घातले ‘तसले’ कपडे, वकिलांच्या घेऱ्यात कोर्टातून बाहेर पडली अभिनेत्री

सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा जॅकलिनची सतत चौकशी करत होती. दरम्यान, अभिनेत्रीने स्वतः साठी अंतरिम जामीनासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज केला होता. अभिनेत्रीचा अर्ज मंजूर करून कोर्टाने सोमवारी (दि. 26 सप्टेंबर) तिचा अंतरिम जामीन मंजूर केला.

ओळख लपवण्यासाठी घातले असे कपडे?
या दरम्यान जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिला वकिलांनी घेरलं असताना ती कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जॅकलिनने जवळपास वकिलांसारखाच पोशाख परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने पांढरा शर्ट घातला असून काळ्या रंगाची पँट घातली आहे. थाेडक्यात जॅकलिन वकिलांच्या पाेशाखात दिसत आहे.

चार्जशीटमध्ये जॅकलिनचं नाव
न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जॅकलिन फर्नांडिसला 50 हजार रुपयांच्या जामीनावर या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 22 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. तत्पूर्वी, 31 ऑगस्ट रोजी न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात (Supplementary Charge Sheet) याची दखल घेत तिला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने जॅकलिनला अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे. आरोपपत्रात आरोपी म्हणून प्रथमच तिचं नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा- आलिया अन् रणबीर देतायेत कपूर खानदानाच्या डोक्याला टेन्शन, होणाऱ्या बाळासाठी आतापासून करतायेत भांडण

ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात आणि पुरवणी आरोपपत्रात अभिनेत्रीचा आरोपी म्हणून उल्लेख नव्हता. मात्र, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या जबाबाचा तपशील कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला होता. ईडीच्या म्हणण्यानुसार, फर्नांडिस आणि फतेही यांना चंद्रशेखरकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली होती.

ईडीने सांगितले की, जॅकलिन फर्नांडिसचे 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर, 2021 रोजी जबाब नोंदवण्यात आले होते. यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, नोरा फतेहीचे 13 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर, 2021 रोजी जबाब नोंदवले गेले आणि तिनेही सुकेशची पत्नी आणि अभिनेत्री लीना पॉलोजकडून भेटवस्तू मिळाल्याचे कबूल केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नेहा अन् फाल्गुनीच्या वादात तिसऱ्याच अभिनेत्रीची एन्ट्री; टोला लगावत नाही तसलं बोलली, तुम्हीही वाचाच
टेलिव्हिजन दुनियेत अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अर्चनाने पळून केले होते लग्न, ब्राह्मणाला रात्री 11 वाजता…

हे देखील वाचा