Friday, March 29, 2024

टेलिव्हिजन दुनियेत अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अर्चनाने पळून केले होते लग्न, ब्राह्मणाला रात्री 11 वाजता…

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंग या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले आहे. ती एकवेळची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. भले चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली नसली, तरी तिने आपल्या दमदार अभिनयाने सहकलाकाराच्या भूमिका देखील गाजवल्या आहेत. मंगळवारी (दि. 27 सप्टेंबर) या अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या आयुष्यातील काही रंजक किस्से जाणून घेऊया.

द कपिल शर्मा शो‘ (The Kapil Sharma Show) यामध्ये आपली खुर्ची थाटात मांडून बसलेली अर्चना पूरन सिंग  (Archana Puran Singh)आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने टेलिव्हिजवरील प्रदर्शित होणाऱ्या अनेक कार्यक्रमामध्ये काम केले आहे. भले सध्या ती कपिल शर्मा शोची खुर्ची सांभाळत असली, तरी तिने आपल्या करिअरची सुरुवात 1987मध्ये आदित्य पांचोली (Aditya Pancholi) याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्यासोबत ‘जलवा’ चित्रपटामध्ये काम केले होते.

अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh) हिचा जन्म (दि. 26 सप्टेंबर) 1965 साली डेहराडूनमध्ये झाला होता. तिने आपल्या करिअरमध्ये मुख्य पात्रापेक्षा सहकलाकार पात्र जास्त निभावले आहेत. तिने आपल्या दमदार अभिनयाने सहकलाकर भूमिकादेखील खूपच गाजवल्या होत्या. तिने बॉलिवूडमध्ये 2005 साली ‘लवस्टोरी’, ‘मोहब्बतें’, ‘क्रिश’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मस्ती’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. अर्चना आपल्या काळामध्ये सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जोत होती. तिने गोविंदाचा ‘बाज’ आणि सुनील शेट्टीचा ‘जज मुजरिम’ या चित्रपटामध्ये आयटम साॅंग केले होते. अर्चनाची सगळ्यात गाजणारी भूमिका म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ मधली मिस ‘ब्रिगेंजा’ ही आहे.

अर्चनाने 1993मध्ये ‘वाह क्या सीन है’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ या टेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये काम केले होते. यानंतर तिने ‘जाने भी पारो’ आणि ‘नहले पे देहला’या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते. तिने आपला पती परमित सेठी (Permit Sethi)सोबत ‘झलक दिखला जा’सारख्या अनेक कार्यक्रमाचे एकत्र परीक्षण केले आहे. अर्चना पूरन सिंग जेवढी पडद्यावर गाजलेली आहे, तेवढीच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली होती. तिने आपला पती परमित सेठीसोबत दुसऱ्यांदा लग्न केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान यांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि हे खूप दिवस लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते. यानंतर त्यांनी 30 जून, 1992मध्ये लग्न केले होते.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये परमित सेठी याने हजेरी लावली होती, तेव्हा त्याने आपल्या लग्नाचा एक रंजक किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता की, “आम्ही रात्रीच्या 11 वाजता एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय केला होता आणि आम्ही लगेच लग्न करण्यासाठी रात्री 12 वाजता ब्राह्मण शोधण्यासाठी निघालो होतो. आम्हाला ब्राह्मण मिळाले, पण त्यांनी आम्हाला विचारले की, तुम्ही पळून लग्न करत आहात का? असे नाही होत लग्नाआधी मुहूर्त काढावा लागतो आणि मग लग्न होते. मग आम्ही ब्राह्मणाला पैसे देऊन सकाळी 11 वाजताच्या मुहूर्तावर आमचे लग्न केले होते. चार वर्षांपर्यत आम्ही आमच्या घरच्यांपासून लग्नाची गोष्ट लपवली होती.”

अर्चना अजूनही चाहत्यांना कपिल शर्मा शोच्या माध्यमातून हसवताना दिसते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रेखा नव्हे अमिताभ बच्चन यांना ‘या’ बंगाली मुलीने लावले होते वेड, वाचा पहिल्या प्रेमाचा रंजक किस्सा
अभिनेत्री बिपाशाचा प्रेग्नंसीबद्दल हैराण करणारा खुलासा; म्हणाली, ‘मी पूर्ण दिवस टॉयलेटमध्ये…’

हे देखील वाचा