बॉलीवूड ते टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेते त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांना देखील स्टार्सचे बालपणीचे फाेटाे बघायला खूप आवडतात. इतकेच नाही, तर बालपणीचे फाेटाे ओळखण्याची स्पर्धाही चाहत्यांमध्ये सुरू असते. या दरम्यान, आणखी एका अभिनेत्याचा बालपणीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख खानसोबत दिसणारा हा लहान मुलगा आहे तरी काेण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काेण आहे हा लहान मुलगा चला जाणुन घेऊया…
शाहरुख खानसोबत या अभिनेत्याचा 21 वर्ष जुना फाेटाे व्हायरल
शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत व्हायरल होत असलेला फोटो 21 वर्ष जुन्या त्याच्या ‘अशोका’ चित्रपटादरम्यानचा आहे. यादरम्यान किंग खानसोबत एक चाहता दिसत आहे. हा मुलगा आता मोठा झाला असून बॉलिवूडवर राज्य करत आहे. अभिनेत्याच्या डावीकडे असलेला हा मुलागा आहे तरी काेण, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही ओळखू शकाता का? आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता बनला आहे. इतकेच नाही, तर त्याने इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्रीशी लग्नही केले आहे.
अभिनेत्याच कॅटरीना कॅफसाेबत आहे विशेष नात
हा छोटा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूड स्टार विकी कौशल (Vicky Kaushal ) आहे. हा फोटो विकीचे वडील शाम कौशल यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शाहरुखच्या उजवीकडे विकीचा भाऊ म्हणजेच अभिनेता सनी कौशल आहे. दोघेही कॅमेऱ्याकडे बघत हसत पोझ देत आहेत.
फाेटाेसाेबत लिहिले खास कॅप्शन
विक्की काैशलचे वडिल शाम काैशल यांनी या फाेटाेला शेअर करत विशेष कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, “देवाच्या कृपेने हा फाेटाे 2001मध्ये अशोकाच्या शूटिंगदरम्यान घेण्यात आला हाेता. चित्रपटाचे डायरेक्टर विष्णू वर्धन हे होते आणि त्यावेळी विकी आठवीत शिकत होता. एके दिवशी विकी फिल्म लाइनमध्ये सामील होईल आणि ‘शेरशाह’ ‘सरदार उधम’ या चित्रपटांसाठी 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार जिंकेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. नशीब आणि देवाचे आशीर्वाद, विष्णुवर्धन.”
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला एक वर्षही झालेलं नाही. अलीकडेच, कॅटरिनाने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला, जिथे विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कॅटरिनाचे काही मित्र उपस्थित होते. त्याच्या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.(actor vicky kaushal and sunny kaushal meet with shah rukh khan on sets of film ashoka actor childhood photo)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे” सीबीआयच्या छापेमारीनंतर समीर वानखेडे यांनी व्यक्त केली भावना
“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट