Tuesday, June 24, 2025
Home भोजपूरी ‘सेक्सी लेडी ऑन द फ्लोर’ अभिनेत्री प्राची सिंगच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट, पाहा व्हिडिओ

‘सेक्सी लेडी ऑन द फ्लोर’ अभिनेत्री प्राची सिंगच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट, पाहा व्हिडिओ

भोजपुरी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या डान्स मुव्हजसाठी ओळखळे जाते. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्राची सिंग. तिने अनेक गाण्यांवर शानदार डान्स मुव्हज केल्या आहेत. आपलेे डान्स व्हिडिओ ती नेहमी पोस्ट करत असते. नुकताच तिने आपला एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया मिळत आहेत.

प्राचीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंंटवर डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती बॉलिवूड ‘रेस’ चित्रपटातील ‘जरा जरा टच मी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सैफ अली खान, कॅटरिना कैफ आणि बिपाशा बासूच्या या गाण्यावर प्राची निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिने व्हिडिओ पोस्ट करत ‘तेरा ही इंतजार है’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने ‘सेक्सी लेडी ऑन द फ्लोर’ अशी कमेंट केली आहे. रेसमधील हे गाणे मोनाली ठाकूर आणि अर्ल एडगर यांनी गायले आहे.

यापूर्वी प्राचीने दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये ‘नाक्का- मुक्का’ गाण्यावरही जबरदस्त डान्स मुव्हज दाखवले आहेत. या गाण्यात तिने लाल रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची साडी घातली होती. व्हिडिओला कॅप्शन देत तिने ‘फेवरेट बीट’ असे लिहिले होते. तिचा हा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला होता. नुकताच तिचा ‘दिल डूबा’ गाण्यावरील व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसली होती.

प्राचीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘मेरे प्यार से मिला दे’ या चित्रपटात अभिनेता किशन रायसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंदन सिंग करणार आहेत. यामध्ये अनूप अरोरा, लोटा तिवारी, संचिता बॅनर्जी आणि आशी तिवारी यांचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! प्रीति झिंटाला किस करणे रितेशला पडले भलतेच महागात, जेनेलियाने केली चांगलीच धुलाई

-‘जाने क्या तुने कही…’, गाण्यावरील अभिनेत्री मिथिला पालकरच्या अदांंनी केले चाहत्यांना घायाळ, एकदा पाहाच

-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

हे देखील वाचा