Saturday, June 20, 2026
Home बॉलीवूड कोणताही थाटमाट न करता आमिर खान आणि गौरी करणार रजिस्टर्ड मैरिज

कोणताही थाटमाट न करता आमिर खान आणि गौरी करणार रजिस्टर्ड मैरिज

आमिर खान हा एक लोकप्रिय अभिनेता असून त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केले. आणि त्याचा चाहतावर्ग त्यामुळे प्रचंड आहे. तसेच या अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच चर्चेत आहे. तर आता आमिर खान तिसऱ्यादा लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले होते आणि गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून दिली होती. तेव्हापासून गौरी प्रत्येक कार्यक्रमात त्याच्यासोबत दिसली आहे.

अमिर (amir)खानचे चाहते अनेक आहेत त्यांना नेहमीच आयुष्यातल्या त्याच्या अपडेट एकण्याबाबत ते  उत्सुक असतात. त्यांना वाटते की, आमिरचे लग्न भव्य असेल की साधे, आणि त्याला कोण उपस्थित राहणार आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. आता, आमिरने स्वतःच त्याच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे, की तो आणि गौरी स्प्रॅट एक साधे आणि खाजगी लग्न करणार आहेत. याचा अर्थ त्यांच्या लग्नात कोणताही थाटमाट होणार नाही.

एका दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खानने खुलासा केला की तो आणि गौरी नोंदणीकृत विवाह करणार आहेत. यापूर्वी, अभिनेत्याची मुलगी आयरा हिचेही नुपूर शिखरेसोबत नोंदणीकृत लग्न झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. गौरी हि आमिर खान पेक्षा 14 वर्षाने लहान असल्याचे समजत आहे. तर वृत्तानुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट 5 जुलै रोजी लग्न करणार आहेत.

“तो मला थोबाडीत मारणार होता” – ट्विंकल खन्नाने आमिर खानवर केला हा आरोप

हे देखील वाचा