Tuesday, August 25, 2026
Home साऊथ सिनेमा धनुष बनला ‘ओम’; 16 ऑक्टोबरला थरार, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्सचा जबरदस्त अनुभव देणारा येतोय चित्रपट

धनुष बनला ‘ओम’; 16 ऑक्टोबरला थरार, अ‍ॅक्शन आणि सस्पेन्सचा जबरदस्त अनुभव देणारा येतोय चित्रपट

धनुष हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता-दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपटे केले आहेत. आणि आता धनुषच्या बहुप्रतिक्षित 55 व्या चित्रपटाचे शीर्षक अखेर जाहीर करण्यात आले आहे. काल म्हणजेच 18 जुन 2026 रोजी निर्मात्यांनी दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांच्यासोबतच्या धनुषच्या या नवीन प्रकल्पाचे अधिकृत शीर्षक ‘ओम‘ (Om) असल्याचे जाहीर केली आहे. आणि हा चित्रपट 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले आहे. तर आता धनुषाच्या आगमी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

दक्षिण भारतीय अभिनेता धनुषचा ‘ओम’ मधील ‘फर्स्ट लूक’ देखील प्रदर्शित करण्यात आला असून, त्यात तो एका दमदार ॲक्शन अवतारात दिसत आहे. शीर्षकाच्या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी हे स्पष्ट केले की हा चित्रपट ‘ओम चॅप्टर 1 – एथिरम: द ब्लड वुड’ या फ्रँचायझीचा पहिला भाग असेल. म्हणजे याचे अनेक भाग प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहेत.

शीर्षक जाहीर करणाऱ्या टीझरद्वारे निर्मात्यांनी ‘ओम’च्या कथेची एक झलक दाखवली आहे, ज्यामध्ये धनुष तीव्र ॲक्शन दृश्यांमध्ये दिसून येतो. या प्रोमोमध्ये जळणारी वाहने, मोठी आंदोलने, शेअर बाजारातील दृश्ये आणि आकाशातून पडणाऱ्या भारतीय चलनी नोटा यांसारखे घटक पाहायला मिळतात; हे सर्व घटक सत्ता, पैसा आणि क्रांती या विषयांवर आधारित एका भव्य ॲक्शन-ड्रामाचे संकेत देतात. यातील थ्रिलरने प्रेक्षकांना हा चित्रपट खेळवुन ठेवणार का हे पाहण्यासारखे असेल आणि धनुषाचा चाहता वर्ग मोठा आहे. आणि तो चाहता वर्ग त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहे.

जुळ्या बाळांच्या आगमनानंतर दिव्यांका त्रिपाठीचा खास फोटोशूट चर्चेत

हे देखील वाचा