Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

रूपा अंडरविअर-बनियानसाेबत टीना दत्ताची तुलना, विशाल कोटियनने साधला निशाना

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये रोज नवनवीन वाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा शाे प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय ‘बिस बॉस’ फॉलो करणारे सेलेब्स देखील शोमध्ये दिसलेल्या स्पर्धकांच्या गेमवर त्यांचे मत व्यक्त करत आहेत, ज्यात विशाल कोटियन याचा देखील समावेश आहे. विशाल ‘बिग बॉस 15‘ मध्ये दिसला होता आणि आता त्याने टीना दत्ता हिच्या खेळावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यादरम्यान त्याने असे काही बोलले ज्यामुळे सोशल मीडिया युजर्स चांगलेच नाराज झाले.

विशाल कोटियन (vishal kotiyan) याने एक ट्विट केले आहे, त्यात त्याने टीना (tina datta) हिची तुलना अंडरवेअर ब्रँडशी केली, ज्यामुळे लोक त्याच्यावर प्रचंड नाराज झाले. शोमध्ये टीनाने स्वत:ला ‘ब्रँड’ म्हणून सांगितले होते, ज्यावर विशालने आपले मत मांडत लिहिले की, “टीना दत्ता ही एक ब्रँड आहे, असे म्हणताना ऐकले आहे. मी विचार करत आहे की, हे अंडरवेअर बनियान आहे. हे लोक रिऍलिटी शोमध्ये दिसले आहेत, परंतु वागणूक स्टार्ससारखी आहे. रियल व्हा, मगच लोक तुम्हाला पसंत करतील. शिव ठाकरे, एमसी स्टीन आणि अब्दू रोजिक हेच खरे खेळाडू आहेत.”

विशाल कोटियनचे हे ट्विट लोकांना अजिबात आवडले नाही आणि त्यामुळेच लोक त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. एका युजरने ट्राेल करत लिहिले की, “तिने 25 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे आणि तुम्ही म्हणता की, ती ब्रँड नाही. हेवा करू नका.” दुसर्‍याने ट्राेल करत लिहिले की, “तुम्ही खूप खरे आहात,आम्ही ते बिग बास 15मध्ये पाहिले. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांना निराश करू नका.”

‘बिग बॉस’मधील टीनाच्या खेळाबद्दल बाेलायचे झाले तर, ती शोमध्ये एक स्ट्राॅंग स्पर्धक मानली जात होती, परंतु आतापर्यंत टीना उघडपणे खेळली नाही. शोमध्ये टीनाचं फक्त शालिन भानोतसोबत बॉन्डिंग पाहायला मिळतं. दोघेही हळू हळू जवळ येत आहेत. पण या व्यतिरिक्त टीनाचा खेळ युजर्सना काही विशेष आवडलेला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती

 

हे देखील वाचा