Thursday, July 18, 2024

शालिन भनोट आणि टीना दत्ताचे पॅचप! कन्फेशन रुममध्ये अभिनेत्याने केला खुलासा…

टीव्ही वरील सगळ्यात जास्त वादग्रस्त आणि चर्चेत असलेला रियालीटी शो ‘बिग बॉस‘च्या घरामध्ये खूपच रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. काही जोडप्यांचे नाते बनत आहे, तर काही जोडप्यांचे नाते तुटत आहे. आता घरामध्ये एक नाही तर तीन जोड्या बनताना दिसून येत आहेत. मात्र, एका जोडप्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे ती म्हणजे शालिन भनोट आणि टीना दत्त.

काहि दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Dutta) यांच्यामध्ये जोरदार वाद पेटला होता, सगळ्यांना वाटले की, हे आता एकमेकांना बोलणार नाहीत पण पुन्हा एकदा यांची जवळीक पाहून सगळ्यांनाच ‘दाल में कुछ काला है’ असे वाटत आहे. झाले असे की, शालिन आणि टीनामध्ये वाद झाल्यानंतर टीना खूपच रडत होती, आणि शालिनही तिच्या चुगल्या करताना दिसून आला होता. गुरुवार ( दि. 20 नोव्हेंबर) दिवशी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये जेव्हा बीग बॉसने टीनाला सांगितले की, तिने पाळलेल्या कुत्र्याची तब्येत खराब झाली आहे आणि तो खूप सिरिअस आहे. तेव्हा टीना खूप दु:खी झाली होती. तेव्हा शालिन तिला सांभळतो आणि विचारतो की, ‘तुला मला पसंत करत आहेस का?’ तेव्हा टीना काहीच न बलता हो अल्याचे डोके हालवते. मग ते खूप जवळ येतात मात्र, हे सगळे होत असताना सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) चांगलीच लाल होते. तिला दोघांची जवळीक पाहूण राग येतो.

बीग बॉस शालिन आणि टीनाला कन्फेश रुममध्ये बोलवतात आणि सांगतात की, मीच तुमची मैत्री करुन दिली आहे, आणि नंतर विचारतात की, त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचे कारण विचारतात. तेव्हा दोघेही आपले मत मांडतात. काही वेळानंतर बीग बॉस स्पर्धकांना एक टास्क देतात की प्रत्येकाला कन्फेशन रुममध्ये जाऊन चुगल्या सांगायच्या असतात तेव्हा शालिन सांगतो की, तीला शालिनसोबत प्रेम झाले आहे पण ती मानत नाही.

काही वेळानंतर जेव्हा टीना एकटी बसते तेव्हा गोरी नागोरी (Gori Nagori) तिच्याकडे येते आणि तिचे लक्ष अचानक तिने घातलेल्या आंगठीडे जाते. मग ती टीनाला विचारते की, ही अंगठी तुझी आहे का? किंवा तुला कुणी दिली आहे. तेव्हा लगेच टीना गोष्ट फिरवते, मात्र गोराला सगळ्या गोष्टी समजतात आणि ती हसत हसत तिथून निघून जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा थेटट्रोलर्सलाच प्रश्न; ‘अक्षय कुमार पॅन्टशर्ट घालून क्रिष्णाची भूमिका करु शकतो मग चित्रगुप्त…’
चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे

हे देखील वाचा