Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

हर हर महादेव I ‘तो अक्षय कुमार असो नाही तर दुसरा कोणी…’, संभाजीराजे कडाडले

गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका आल्या आहेत. या चित्रपट आणि मालिकेमध्ये अनेकदा इतिहास चुकीच्या प्रकारे दाखवल्याचा आराेप करण्यात आला आहे. याच विषयावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे चांगलेस संतापल्याचे पाहायला मिळाले. आज (दि. 6 नाेव्हेंबर)ला  पत्रकार परिषद घेऊन इतिहासाची माेडताेड करणाऱ्यां चित्रपट निर्मात्यांवर तीव्र शब्दात ईशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट काढण्यासाठी आमच्या परवाणगीची गरज नाही, असेही त्यांनी म्हणटले.

पत्रकार परिषदमध्ये पत्रकारांनी विचारले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?” त्यावर प्रतिउत्तर देताना संभाजीराजे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका काेणीही करू शकताे. जर त्याचे मन स्वच्छ असेल आणि याेग्य शिवाजी महाराज प्राेजेक्ट करायचा असेल तर आम्ही त्याच्या बराेबर आहाेत, पण त्याच्यामध्ये इतिहासाची माेडताेड हाेत असेल मग अक्षय कुमार असुदे किंवा आणखी कुठला टाॅप माेस्ट ऍक्टर असू दे आम्हा कडाडून विराेध करू.”

संभाजीराजे पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनत असेल तर आम्ही स्वागतच करू. महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी आमच्या परवाणगीजील गरज नाही, पण इतिहास चुकीचा दाखवला जात तर याद राखा. अशा गाेष्टी अनेकदा घडत असतील, तर बाेलणे महत्वाचे आहे ना. सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली तुम्ही काहीही दाखवू शकत नाही. याला काही मर्यादा असायला हव्यात. तुम्ही भालजी पेंढारकरांनी काढलेले सिनेमा पाहा, इतिहासाचा अभ्यास करा.”

“संभाजीराजे जेवढा मवाळ आहे, तेवढाच कडकही आहे. मला जेव्हा कडकपणा दाखवायचा असेल, तेव्हा मी माझ्या भूमिकेतून मागे हटणार नाही. मी कुठल्याच प्रकारे कॉम्प्रोमाईज करणार नाही. मी अमरण उपोषण केलेला माणूस आहे. काय करायला पाहिजे आणि काय नाही, हे मला सांगण्याची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रात राहता, छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानता, मग असे चित्रपट काढणार असाल, तर किती दुर्दैवी आहे. चांगले चित्रपटही आले आहेत, त्याचे प्रशंसा करायला हवे. पण, चुकीची इतिहास खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत चित्रपट निर्मात्यांवर केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
छत्रपती शिवरायांवर आधारित ‘या’ सिनेमावर बंदी घालण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

अरे वाह! प्रशांत दामले यांनी 12,500 प्रयोगांचा टप्पा केला पार, सचिनने केले काैतुक

हे देखील वाचा