बाॅलिवूड अभिनेता इशान खट्टर याचा ‘फोन भूत‘ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करु शकला नाही. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी फ्लाॅप ठरला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ईशान खट्टरने त्याच्या कुटुंबाविषयी खुलासा केला, ज्यामुळे इशान चांगलाच चर्चेत आला आहे.
इशान (ishaan khattar) याने एका मुलाखतीत सांगितले की, “त्याची वहिनी मीरा कपूर (Mira Rajput Kapoor) नेहमीच तक्रार करते की, ‘चपला तू इथे फेकल्या, तू हे केले नाहीस’, असे ती नेहमी सांगत असते. अशा तक्रारी मी अनेकदा ऐकतो. मात्र, मला मीराचीही प्रेमळ शैली आवडते.”
View this post on Instagram
मीराला आहे आयुर्वेद, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीबद्दल माहिती
ईशानने पुढे म्हणाला की, “मीरा वहिनी सरप्राईज पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये कायमच खूप पुढे असते.” ईशानने सांगितले की, “मला मीरा वहिनीकडून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. मीरा वहिनीला आयुर्वेद, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीबद्दलही भरपूर माहिती आहे.”
View this post on Instagram
मीरा कपूरने ईशान खट्टरच्या वाढदिवसानिमित्त एक लव्ह नोट देखील लिहिली होती. इशान खट्टरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मीराने त्याला सर्वांच्या लाडाचे सांगितले. ईशान खट्टर हा त्याचा भाऊ शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या फार जवळचा आहे. त्याला अनेकदा कुटुंबासोबत पाहिले जाते. शाहिद आणि मीरासोबत ईशान खट्टरही सोशल मीडियावर कायम सक्रिय असताे. चाहते त्याच्या फाटाे आणि व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा भरभरुण वर्षाव करतात. (bollywood actor ishaan khattar revealed the secrets of the family also said this about sister in law meera)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये भाग्यश्री-भूमिका चावलाची एन्ट्री?
मुलीच्या जन्माबद्दल भारती सिंगने रणबीर-आलियाचे केले अभिनंदन, म्हणाली…