बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताचं अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) याने झगमगत्या विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कार्तिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं. ज्यामुळे अभिनेत्याच्या नावाची तुफान चर्चा रंगली. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे कार्तिक चर्चेत आला आहे. आता चक्क या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
आता बातमी त्याच्या वैयक्तिक आयुष्याची आहे. कार्तिकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सारा अली खानसोबत ब्रेकअप झाल्यापासून तो सिंगल आहे. पण आता अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत कार्तिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पशमीना रोशन(Pashmina Roshan) ही संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आहे. वृत्तानुसार, पशमीना रोशन आणि कार्तिक आर्यन यांच्या भेटण्याचं प्रमाण वाढलं आहे. पशमीना आणि कार्तिक यांच्यात असलेली मैत्री आता वेगळं वळण घेताना दिसत आहे. शिवाय अभिनेता पशमीनाला भेटण्यासाठी देखील उत्सुक असतो. एवढंच नाही तर, पापाराझींचं लक्ष वळवण्यासाठी दोघे त्यांच्या ड्रायव्हरसोबत बाहेर पडतात. त्यांच्या डेटिंगबद्दल अजून कोणाला कळू नये याचीही ते काळजी घेत आहेत.
दिवाळीच्या दिवशी कार्तिक पशमीनासोबत त्याच्या नवीन मॅकलरेन कारने जुहू ड्राइव्हला गेला होता. रात्री उशीरा घालवण्याची त्याची आवडती ठिकाणी जातात. माध्यमाच्या वृत्तानुसार, कार्तिक आणि पशमीना अनेकदा एकमेकांच्या घरी जातात. त्यांचे नाते केवळ मैत्रीचे नाही तर त्याहूनही अधिक आहे. ते अनेकदा एकमेकांसोबत चिल करतांना दिसतात.
View this post on Instagram
पशमीनाने हृतिक रोशनसोबत चांगले संबंध आहेत. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘इश्क विश्क’ च्या सिक्वेल ‘इश्क विश्क रिबाउंड’मध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याला 58 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. कार्तिक आर्यन देखील त्याच्या फॉलोअर्सपैकी एक आहे. पशमीना तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या कार्तिक ‘फ्रेडी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये कार्तिकची न दिसणारी स्टाईल पाहायला मिळाली. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर थिएटरऐवजी प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. ‘फ्रेडी’नंतर कार्तिक आर्यनच्या खात्यात अनेक चित्रपट आहेत. ‘शेहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘कॅप्टन इंडिया’ आणि कबीर खानच्या पुढील चित्रपटातही तो दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘टीनाला दाखवावं लागेल तिचं स्टेटस’, सुंबूल-शालीनच्या नात्यावर ‘इमली’च्या वडिलांचं मोठं वक्तव्य
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! एव्हलिन शर्माने वाढदिवसानिमित्त एका वर्षानंतर दाखवला लेकीचा चेहेरा