Tuesday, May 21, 2024

‘टीनाला दाखवावं लागेल तिचं स्टेटस’, सुंबूल-शालीनच्या नात्यावर ‘इमली’च्या वडिलांचं मोठं वक्तव्य

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘ चे स्पर्धक सुंबूल तौकीर खान आणि शालीन भानोत यांच्या नात्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आधी चाहत्यांनी आणि नंतर घरातील सदस्यांनी दोघांच्या जवळीकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर आता शोचा होस्ट सलमान खानने ‘सुंबूल तौकीर खानला शालीन भानोटचे वेड आहे’ असे सांगितले आहे. सलमान खानच्या या वक्तव्यानंतर सुंबुलच्या जवळच्या मित्रांनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे अभिनेत्रीच्या मित्रांनी सलमान खानचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री सुंबुल (Sumbul) हिचे वडील तौकीर हसन खान (Touqeer Hasan Khan) यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले की, “सुंबूलला शालीनचे वेड नाही, ती फक्त शालीनची काळजी घेते आणि ते दोघेही फक्त मित्र आहेत.” सौंदर्याने एमसी स्टॅनला मारामारीदरम्यान पाठीमागून मारले. पण, कोणीही लक्ष दिले नाही आणि सुंबुल प्रसिद्धीच्या झोतात आली.”

आपले बोलणे पुढे चालू ठेवत सुंबुलचे वडील सांगतात, “शोमध्ये सगळे एकमेकांना किस करत राहतात, मिठी मारत असतात. पण, या सगळ्यांना फक्त मित्र म्हणतात आणि जर सुंबुलने तसं केलं तर तिला वेडं म्हटलं जातं. प्रत्येकाला माहित आहे की, सुंबूलला जितके जास्त टार्गेट केली जाईल तितकी जास्त तिला प्रसिद्धी मिळेल. ती एक सोपी टार्गेट बनली आहे.”

सुंबुलचे वडील पुढे सांगतात, “सुंबूल आणि शालीनमध्ये बरेच साम्य आहे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. असे असूनही सुंबूलला शालीनमध्ये ‘फादर फिगर’ दिसते.” माध्यमातील वृत्तानुसार, बिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडमध्ये सुंबुलला तिच्या वडिलांशी बोलण्यासाठी कन्फेशन रूममध्ये बोलावले जाईल. सुंबुलचे वडील तिला समजावून सांगतील आणि टीना-शालीनला धडा शिकवण्याची योजना सांगतील. (big boss 16 sumbul father touqeer hasan khan supported her after salman called her obsessed for shalin bhanot)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! महानायकांच्या घराचा सुरक्षा घेरा तोडून घुसला अज्ञात व्यक्ती, पुढं…

धक्कादायक! अमेरिकेतील कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा आवाजच गेला, उपचारासाठी धावले डॉक्टर

हे देखील वाचा