Tuesday, May 21, 2024

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! एव्हलिन शर्माने वाढदिवसानिमित्त एका वर्षानंतर दाखवला लेकीचा चेहेरा

बॉलीवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा हिने मे 2021 मध्ये तिचा इंडो-ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड डॉ. तुषान भिंडीसोबत लग्न केले. तुषान हे व्यवसायाने डेंटल सर्जन आणि उद्योजक आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. गेल्या एक वर्षापासून, एव्हलिन सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना तिची मुलगी अवा रानिया भिंडीची झलक दाखवत आहे. पण अजून तिने मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. अशात लेकीला एक वर्ष पूर्ण होताच तिने अवाचा चेहरा दाखवला आहे. एव्हलिनने नुकताच अवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. जाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे. या फाेटाेमध्ये तिचा पती डॉ. तुषान भिंडी हे देखील दिसत आहेत. हा कौटुंबिक फोटो शेअर करत तिने लिहिले, “आमची छोटी क्यूटी अवा 1 वर्षाची झाली!! आता फक्त एक वर्ष झालं पण तुझ्याशिवाय या आयुष्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

एव्हलिनने पुढे लिहिले, “तुमचे हसणे आणि घट्ट पकडणे हे सर्व काही आहे! तू आहे तशी फियर्स आणि वंडरफुल रहा! आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो! आणि जगातील सर्वोत्तम पहिल्या वाढदिवसाची पार्टी दिल्याबद्दल तुमच्या बिना-आईचे खूप खूप आभार! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” अवीनने तिच्या कॅप्शनमध्ये बरेच इमोजी देखील वापरले आहेत.

एव्हलिन शर्मा आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस स्पेशल करण्यासाठी पतीसोबत सिडनीला गेली होती. एव्हलिनची सासू बीना भिंडी यांनी त्यांच्या नातीनसाठी बर्थडे पार्टीचे आयोजिन केले होते. रोझ बे येथील एम्पायर लाउंजमध्ये भिंडी कुटुंबाने वाढदिवसाची भव्य पार्टी केली. अवाच्या या वाढदिवसाच्या पार्टीत तिला प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी 100 हून अधिक पाहुणे उपस्थित होते. (bollywood actress evelyn sharma daughter ava rania bhindi face reveals she shared photo form first birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! महानायकांच्या घराचा सुरक्षा घेरा तोडून घुसला अज्ञात व्यक्ती, पुढं…
धक्कादायक! ‘तारक मेहेता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात

हे देखील वाचा