Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड ‘यक!’, वडील सैफ अली खानचे ‘ते’ डबल मीनिंग गाणे ऐकून साराने दिली होती प्रतिक्रिया

‘यक!’, वडील सैफ अली खानचे ‘ते’ डबल मीनिंग गाणे ऐकून साराने दिली होती प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना अभिनयाचे बाळकडू आपल्या घरातूनच मिळाले आहे. यातीलच एक म्हणजे सुपरस्टार सैफ अली खानची मुलगी आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री सारा अली खान होय. साराचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे. हे अनेकवेळा तिने दाखवून दिले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का साराला आपल्या वडिलांची एक गोष्ट अजिबात आवडत नाही. याबाबत तिने खुलासा केला होता.

साराने कॉफी विद करणमध्ये वडील सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती. यादरम्यान तिला विचारण्यात आले होते की, तिच्या वडिलांचा सर्वाधिक नावडता चित्रपट कोणता होता?, त्यावेळी तिने सन १९९४ मध्ये आलेला ‘यार गद्दार’ या चित्रपटातील गाणे ‘रॅट साँग’चे नाव घेतले होते. गाण्याचे बोल ऐकून ती स्वत: लाजली होती. या चित्रपटात सोमी अली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

खरं तर करण जोहरने सन २०१८ मध्ये सारा अली खानसोबत कॉफी विद करणमध्ये एक रॅपिड फायर राऊंड खेळला होता. यादरम्यान त्याने तिला विचारले होते की, तिच्या वडिलांचा सर्वात वाईट चित्रपट कोणता आहे? यावर तिने म्हटले होते की, “चित्रपटाबद्दल तर मला माहिती नाही. परंतु गाण्याचे नाव रँट साँग आहे.” यावर सैफ अली खानने त्या चित्रपटाचे नाव सांगितले होते ‘यार गद्दार.’ यामधील गाण्याचे बोल आहेत ‘मेरा चूहा काटेगा, कहां है तेरी बिल्ली.’ गाण्याचे बोल ऐकून करण जोहरही स्तब्ध झाला होता, तर साराने ‘यक’ म्हणत प्रतिक्रिया दिली होती.

सैफच्या या गाण्याबद्दल वाईट वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी तो या डबल मीनिंग गाण्याबद्दल म्हणाला होता की, “गाण्याचे बोल होते, मेरा चूहा तुमको काटेगा, जे मला माझ्या पँटमधून बाहेर काढायचे होते. त्यावेळी असे गाणे चालायचे.”

सैफ अली खान शेवटचा ‘तांडव’ वेबसीरिजमध्ये झळकला होता, तर सारा ‘कुली नंंबर १’मध्ये दिसली होती.

सैफ आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दलही त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. तरीही, यानंतर त्याने माफी मागितली होती. सैफ आदिपुरुष चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा