बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. ती 11 वर्षांची झाली आहे. आराध्या आणि ऐश्वर्याचे खूप चांगले बॉन्डिंग आहे. आराध्याला ऐश्वर्याच्या बहुतेक शूटिंग लोकेशन्स आणि फॅशन शोमध्ये स्पॉट केले जाते. 16 नोव्हेंबरला आराध्याच्या 11 व्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, ऐश्वर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. यासोबतच तिने मुलीसाठी वाढदिवसाची सुंदर नाेटही लिहिली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने मुलगी आराध्याच्या 11 व्या वाढदिवसानिमित्त लिहिले, “माझे प्रेम… माझे जीवन… आय लव यू, माझी आराध्या.” यासोबतच तिने कॅप्शनमध्ये अनेक इमोजी देखील वापरले आहेत. फाेटाेत ऐश्वर्या आपल्या मुलीला किस करत असल्याचे दिसत आहे. त्यासाेबतच आराध्या रेड आउटफिटमध्ये दिसत आहे आणि बॅकग्राउंडला फुलांनी सजवलेले 11 लिहिलेले दिसत आहे.
ऐश्वर्या राय बच्चनच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी तिच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोघांच्या बॉन्डिंगचे कौतुक केले. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सुंदर चित्र.. किस घेताना एक आई आणि मुलगी.. एका आईचे आपल्या लेकीसाठी आणि लेकीचे तिच्या आईसाठी असलेले शुद्ध प्रेम.. आराध्याला 11व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर एप्रिल 2007 मध्ये लग्न केले होते. या जोडप्याने 16 नोव्हेंबर 2011ला आराध्याचे स्वागत केले. मायलेकींमध्ये घट्ट नाते आहे आणि ते नेहमी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाच्या शूटिंग आणि प्रमोशनदरम्यान आराध्या तिच्या आईसोबत दिसली होती.
ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्याने ‘पोनियिन सेल्वन I’ या चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचा दुसरा भाग एप्रिल 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (bollywood aaradhay bachchan birthday actress aishwarya rai bachchan wish her daughter with photo)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश
मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या 58 व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर