Tuesday, May 28, 2024

मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या 58 व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर

हिंदी चित्रपटसृष्टीत 80-90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच, पण आपल्या सौंदर्याने सर्वांना थक्क केले. आज त्यातील बहुतांश अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या, तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जोडल्या गेल्या आहेत. त्यात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या नावाचाही समावेश आहे. मीनाक्षी यांनी त्यांच्या चित्रपटांमधील चमकदार अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

मीनाक्षी सध्या चित्रपटांपासून दूर असल्या, तरी त्या त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. अशातच मीनाक्षी बुधवारी 16 नोव्हेंबरला त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे.

मीनाक्षी यांनी बॉलिवूडमध्ये ‘दामिनी’, ‘हीरो’, ‘घातक’, ‘घायल’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘दामिनी’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला चार चाँद लावले होते. मीनाक्षी यांचा पहिला चित्रपट ‘पेंटरबाबू’ होता, पण तिच्या कामाला ‘हिरो’ चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात हिरो जॅकी श्रॉफ होते. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि मीनाक्षी एका रात्रीत स्टार बनल्या.

मीनाक्षी यांनी जवळजवळ प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकासोबत काम केले. अमिताभ बच्चन ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर असे दिग्गज कलाकार त्यांच्या चित्रपटातील हिरो होते. मीनाक्षी यांनी अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मेयर यांच्याशी लग्न केले. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली. आधी दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’

प्रतीक्षा संपली! आलियाने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला फाेटाे; चाहते म्हणाले, ‘बाळाचा फाेटाे…’

हे देखील वाचा