Saturday, February 14, 2026
Home अन्य प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

टीव्हीचे ‘लव्ह बर्ड कपल’ म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी बर्‍याचदा असे काहीतरी करतात, ज्यामुळे दोघांमधील बॉंडिंग चाहत्यांना पाहायला मिळते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि हे ते नेहमी दाखवतही असतात. प्रिन्स नरुलाने पत्नी युविकाला किस करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे दोघेही अगदी रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. आता अशा रोमँटिक फोटोंवर कमेंट करताना, चाहते कुठे मागे राहतील? या जोडीचा हा फोटो इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहे.

प्रिन्स नरुलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे दोन फोटो शेअर करून, सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये प्रिन्स पत्नी युविका चौधरीला किस करताना दिसत आहे. फोटो पाहता या दोघांमधील प्रेम दिसून येत आहे. हे फोटो शेअर करत प्रिन्सने खूप रोमँटिक असे कॅप्शनही लिहिले आहे. प्रिन्सने लिहिले, “हॅप्पी किस डे बेबी, माहिती आहे की आज किस डे नाही, पण मनाला वाटलं म्हणून लिहिलं, लव्ह यू.” हा फोटो आणि रोमँटिक कॅप्शन पाहून चाहतेही त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

प्रिन्स नरुलाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2014 मध्ये, पंजाब टीव्हीच्या रिएलिटी शो ‘मिस्टर पंजाब’ पासून केली होती. यानंतर, एमटीव्ही रोडीजचा सिझन 12 आणि स्प्लिस्टविला सिझन 8 मध्ये भाग घेतल्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला.

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांचे 12 ऑक्टोबर, 2018 रोजी लग्न झाले होते. या दोघांच्या लग्नात बॉलिवूड ते टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटीज पोहोचले होते. त्यांची लव्ह स्टोरी ‘बिग बॉस’ मधून सुरू झाली. प्रिन्स हा ‘बिग बॉस 9’चा विजेताही ठरला. या दोघांचे प्रेम इतके वाढले की त्यांनी लग्नही केले. लग्नानंतर प्रिन्स आणि युविका ‘नच बलिये सिझन 9’ मध्ये देखील दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा