Wednesday, September 30, 2026
Home › बॉलीवूड › छोट्या बजेटच्या चित्रपटांना आयुष्यान खुरानाचा पाठिंबा, तर या चित्रपटाची केली प्रशंसा

छोट्या बजेटच्या चित्रपटांना आयुष्यान खुरानाचा पाठिंबा, तर या चित्रपटाची केली प्रशंसा

आयुष्मान खुराना हा सध्या फिक्की फ्रेम्स मध्ये केलेल्या एका उत्तम व्यक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने ‘सिनेमा ॲट क्रॉसरोड्स – द रूल्स ऑफ द बिग स्क्रीन’ या सत्रात त्याचे विचार मांडले. तो म्हणाला 2026 मधील कमी बजेट असलेल्या हनुमान अंश’ आणि ‘ऑब्सेशन’ यानी उत्तम यश मिळवले. तसेच या सत्रात वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डेन्झिल डायस आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनीही सहभाग घेतला होता.

एका वृत्तानुसार चित्रपटाच्या व्यवसायावर आयुष्मान खुराना (Khurana)बोलातना म्हणाला की, प्रथम त्याने ‘हनुमान अंश’ आणि ‘ऑब्सेशन’या सारख्या कमी बजेट असुनही उत्तम कामगिरी केल्याबाबत आंनद व्यक्त केला. आणि म्हणाला की मला असे वाटते आपण असे चित्रपट बनवले पाहिजेत. आपण बजेटची जाणीव आणि त्यातुन लोकांशी जोडले गेले पाहीजे तसेच ते पुढे म्हणाला की हे बोलण सोपे आहे पण तसे होणे सोपे नसते.

तसेच अभिनेत्याने पुढे म्हणले की, चित्रपटाची कथा हि अभिनेत्यापेक्षा मोठी असली पाहीजे. जसे की ‘उडता तीर’ याचे उदाहरण देले. माझ्या पहिल्या चित्रपटापासुन माझा विश्वास राहीला आहे की, खरा सुपरस्टार कथाच राहीली पाहिजे. आणि  गेल्या 20 वर्षांत मी विशेष प्रकल्पांपासून ते सामान्य चित्रपटांपर्यंत अनेक प्रकारचे चित्रपट केले असले तरी, आता मी माझ्या मुळ ओळखीकडे परत येत आहे. तसेच माझा आगामी चित्रपट उडता तीर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

“हनुमान अंश” या चित्रपटाबाबत पाहायचे झाल्यास हा चित्रपट विशाल चतुर्वेदी यांनी लिहला आहे आणि दिग्दर्शित केला आहे. आणि नीम करोली बाबांच्या जीवनावर हा आधारीत आहे. या 2 कोटी बजेटच्या चित्रपटाने भारतात 312.38 कोटी पेक्षा ही आधिक कमाई केली आहे. तसेच “ऑब्सेशन” या चित्रपटने बॉक्स ऑफिसवर 300 दशलक्ष डाॅलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ 700000 डाॅलर्समध्ये बनवला होता.

हही वाचा

अजय देवगण-अमृता फडणवीसांनी राबवले जुहु बीचवर स्वच्छता अभियान

हे देखील वाचा