विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (दि, 19 नोव्हेंबर) रोजी आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच अभिनेत्री आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे सतत तर्चेत असते. तिने अनेक मोठ मोठ्या कलाकारांबोत नाते ठेवले होते. त्यामुळे अभिनेत्रीला सतत ट्रोलिंगचा देखिल सामना करावा लागतो.
विश्वसुंदरी सुश्मिता सेन (Sushmita Sen) आज आपला 47 वा वाढदिवस साजरी करत आहे, त्यामुळे आज अभिनेत्रीवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनी तिला पोस्ट शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मात्र, या सगळ्यामध्ये एका पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. सुश्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman shawl) याने देखिल सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल दोन वर्षापार्यत एकमेकांना डेट करत होते. दोघांची जवळीक खूप चांगली होती मात्र, गेल्या वर्षीच या दोघांचे ब्रेकअप झाले. सुश्मिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नातं तुटल्याची बातमी सांगितली होती. मात्र, तरीही रोहमनने सुश्मिताला 47व्या वाढदिवसाच्या शुभेच्छ हटके अंदाजात दिल्या आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हटके फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये सुश्मिता खूपच सुंदर दिसत आहे.

सुश्मिता आणि रोहमनची खूपच सुंदर लव्हस्टोरी आहे. रोहमना हा आदिपासूनच सुश्मिताचा फॅन होता. त्याने एकदिवस इंस्टग्रामवर सुश्मिताला मेसेज केला आणि सुश्मिताने चुकीने पाहिला आणि त्याला रिप्लाय देखिल दिला. मग यानंतर रोहमन यानेही तिला मेसेज केला की, ‘आज तो मेरा दिन बन गया मै तो कमरे मे उछलराहा हूॅं’
View this post on Instagram
नंतर मसेज वाढत गेले आणि गाठीभेटी वाढू लागल्या आणि दोघेही रिलेशन शिपमध्ये आले. सध्या तर दोघेही वेगळे झाले आहेत मात्र, तरीही रोहमानला सतत सुश्मितासोबत स्पॉट केले जाते. रोहमनचे नाते तिच्या मुलीसोबतही खूप चांगले आहे. सुश्मिताने ब्रेकअप बद्दल माहिती देत असताना सांगितले होते की, ‘शुरुआत दोस्ती से हुई थी और वो हमेशा रहेगी। रिश्ता खत्म हुआ है, प्यार नहीं।’ अभिनेत्रीने अशी पोस्ट करुन सगळ्यांना त्यांच्या मैत्रीबद्दस सांगितले होते. म्हणूनच ते दोघे सतत स्पॉट होताना दिसून येतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान
‘जेव्हा मी पावसात अंघोळ करायची तेव्हा…’, एवढ्या वर्षांनी झीनत अमान यांचा मोठा खुलासा