बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या बातम्या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. कुठेही सामना असो, उर्वशी रौतेलाही क्रिकेटपासून दूर राहत नाही. त्यांच्या अफेअरच्या बातम्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहेत. अशातच आता उर्वशी रौतेला हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
नुकतेच उर्वशी रौतेला (urvashi rautela ) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फाेटाेमध्ये उर्वशी रौतेला हात जाेडून देवासमोर उभी आहे. यासोबतच फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने चाहत्यांना काय मागायचे असा सवालही केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चाहत्यांनी उर्वशीच्या पाेस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
काही युजर्सनी उर्वशीला केले ट्रोल
उर्वशीच्या या फोटोवर चाहत्यांनी तिला ऋषभ पंतचा हात मागण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीला ट्रोल करताना काही चाहत्यांनी लिहिले की, “मॅडमला न्यूझीलंडचा व्हिसा मिळाला नाही.” उर्वशीच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “आम्हाला समजले आहे की, तुझी ऋषभ पंत परत येण्याची येण्याची इच्छा आहे.”
View this post on Instagram
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांची नावे बऱ्याच दिवसांपासून जोडली जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या बातम्या सतत समोर येत आहेत. खुद्द ऋषभ पंतही उर्वशीपासून अंतर राखतो. मात्र, उर्वशी ऋषभच्या बाबतीत सतत चर्चेत असते.
क्रिकेटपटू शुभमन गिलनेही या दोघांबाबत वक्तव्य केले आहे. खुद्द ऋषभ पंतलाही उर्वशीपासून अंतर राखायचे आहे, असे शुभमन गिलने सांगितले होते. यानंतरही दोघांच्या बातम्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. (bollywood actress urvashi rautela posted photo of her praying to god and ask fans what to demand got rishabh pants name)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुशल टंडनने सुंबुलच्या वडिलांवर केली टीका; म्हणाला, ‘टीना देखील कोणाची तरी लेक’
अर्रर्र! असे काय घडलं की, सुंबुल तौकीर खान वडिलांसमोर रडली ढसाढसा?