Thursday, March 28, 2024

अर्रर्र! असे काय घडलं की, सुंबुल तौकीर खान वडिलांसमोर रडली ढसाढसा?

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये दिवसंदिवस बदल हाेताना दिसत आहेत. एपिसोडच्या सुरुवातीला अर्चना गौतम आणि टीना दत्ता यांच्यात जाेरदार भांडण पाहायला मिळाले हाेते. त्याचवेळी सुंबुल तौकीर खान बिग बाॅस घरामध्ये रडताना दिसली, जेव्हा तिच्या वडीलांनी तिला शालीन भानोत आणि टीना दत्तापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. कॅप्टेंसी टास्कदरम्यान साजिद खूपच अग्रेसिव हाेताना दिसला. अशातच आता शिव ठाकरे घराचा नवीन कॅप्टन झाला आहे.

सुंबुल तौकीर खान (sumbul tauqeer khan ) कन्फेशन रूममध्ये येते आणि तिच्या वडिलांशी बोलते. सुंबुलच्या वडिलांनी तिला टीना आणि शालिन भानोतपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. ती रडते आणि तिच्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन करण्यास तयार होते. नंतर सुंबुल साजिद खानकडे जाते आणि त्याला त्याची खोली बदलायला सांगते.

शिव ठाकरे आणि निमृत अहलुवालिया कॅप्टन्सी टास्क दरम्यान टीना दत्ता आणि शालीन भानोट यांच्या नात्याबद्दल बोलतात. शिव म्हणतो की, “टीना शालिनबद्दलच्या तिच्या भावना पुन्हा पुन्हा बदलत आहे.” त्यावर निमृतने सांगितले की, “भांडणादरम्यान दोघेही अग्रेसिव हाेतात.” अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांनी शालीन-टीनाच्या नात्याबद्दल चर्चा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

दोघांचे म्हणणे आहे की, टीना दत्ता आणि शालीन खेळात पुढे जाण्यासाठी खोट्या प्रेमाने लोकांना मूर्ख बनवत आहेत. दरम्यान, बिग बॉसने  कॅप्टेंसी टास्कची अनाउंसमेंट केली आणि प्रियांका चहर चौधरी, अंकित गुप्ता आणि अर्चना गौतम यांना आत बसण्यास सांगितले आणि इतर टीम सदस्यांना सूचना देण्यास सांगितले.

यानंतर अर्चनाने शिवला एका भांड्यात मीठ टाकून ते प्यायला सांगितले. साजिदने शिवला तसे करण्यास मनाई केली कारण, ते धोकादायक ठरू शकते. त्याचवेळी अंकितने अब्दूला कच्चे अंडे प्यायला सांगतले, जे तो करतो. पण जेव्हा अंकितने त्याला पाच मिनिटांत दोन लिटर पाणी पिण्यास सांगितले तेव्हा साजिद ते खूप धोकादायक असल्याचे सांगताे व तसे करण्यास नकार दिला.

घरातील सदस्यांमध्ये आयोजित केलेल्या कार्यानंतर, शालीन भानोत, टीना दत्ता आणि सौंदर्या शर्मा यांना अब्दू रोजिक आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये घराचा कॅप्टन निवडण्याची संधी मिळते. सुरुवातीला, सौंदर्या आणि टीना अब्दूला कॅप्टन बनवण्यास सहमती देतात, परंतु नंतर त्या शालीनला विचारले असता ताे असहमती दर्शवताे. अखेर शिव ठाकरे कॅप्टन म्हणून निवडला जाताे. (tv bigg boss 16 latest episode shiv thakre new captain of house sumbul tauqeer khan cry rk)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यन पडला प्रेमात,’या’ दिग्गज अभिनेत्याच्या बहिणीला करतोय डेट

भोपाळ वनविभागात दगडफेक केल्यामुळे भडकली रवीना टंडन, व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

हे देखील वाचा