Friday, April 19, 2024

कुशल टंडनने सुंबुलच्या वडिलांवर केली टीका; म्हणाला, ‘टीना देखील कोणाची तरी लेक’

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘ खूपच चर्चेत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुंबुल तौकीर खान हिचे वडील, ज्यांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर टीना दत्ता आणि शालिन भानोत यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचा इशारा दिला. बिग बॉसचा माजी स्पर्धक कुशल टंडन याने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आणि टीनाचे समर्थन केले. 

अलीकडील एपिसोडमध्ये, सुंबुल (sumbul toqueer) हिचे वडील त्यांच्या मुलीला खोट्या वैद्यकीय कारणास्तव फोन करतात आणि टीना (tina datta) तसेच शालीन भानोट यांच्याबद्दल अपमानास्पद कमेंट करतात. त्यांनी आपल्या मुलीला टीनाच्या तोंडावर लाथ मारण्याचा सल्ला दिला आणि तिला राष्ट्रीय टेलीविजनवर त्या दोघांची ‘लायकी’ दाखवण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी सुंबूलला शालीन आणि टीनापासून दूर राहण्यास सांगितले कारण, दोघेही विश्वास ठेवण्यासारखे लोक नाहीत. आता सुंबुलच्या वडिलांच्या या शब्दांवर कुशल (kushal tandon) याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुशल टंडनने ट्विट करून लिहिले की, “सुंबूल एक स्पर्धक असल्याने तिच्या वडिलांना ती कशी चालली आहे हे पाहण्यासाठी स्टेजवर येण्याची परवानगी देण्यात आली होती. ती एकमेव स्पर्धक अशी आहे, जिचे वडील तिला कॉल करतात आणि फोनवर बोलू शकतात.

कुशल टंडन इथेच थांबला नाही, त्याने पुढे ट्विट केले आणि बिग बॉसच्या सेगमेंटला प्रश्न केला आणि टीनाला पाठिंबा दिला. त्याने पुढे ट्विटमध्ये लिहिले की,“आता तिच्या वडिलांना फोन करण्याची परवानगी कशी आहे? तो इतर कोणत्याही स्पर्धकाबद्दल कसा बोलू शकतो. ती सुद्धा कोणाची मुलगी आहे?तिचे वडील सांगत आहेत की, ‘टीना ही बास्टर्ड आहे. त्याच्यापासून दूर रहा.’ असे मत मांडत कुशलने जाब मागितला आहे.

या आठवड्यामध्ये कॅप्टन म्हणून शिव ठाकरेची निवड झाली आहे. (tv bigg boss16 actor kushal tandon support tina datta and lashes at sumbul toqueer khan father)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिशा पटानीची साेशल मीडियावर हवा, बाथरूम सेल्फीने चाहत्यांना घातली भूरळ

किस कसं करावं हेही कार्तिक आर्यनला नव्हतं माहिती! 37 रिटेकनंतर मिळाला होता परफेक्ट शॉट

हे देखील वाचा