Saturday, January 17, 2026
Home मराठी झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला अटक, 5 लाख रुपयाचे दागिने चोरी केल्याचा आरोप

झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला अटक, 5 लाख रुपयाचे दागिने चोरी केल्याचा आरोप

प्रिसद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा प्रथम बॉलिूवड चित्रपट ‘झुंड‘ या चित्रपटामध्ये बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका स्वीकारली होती. यामध्ये ‘बाबू’ नवाची मुख्य भूमिका साकरणारा कलाकार प्रियांशू क्षत्रिय याला चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

‘झुंड’ (Zhund) फेम बाबू याच्यावर नागपूरमध्ये दागिने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांशूचे वय 18 वर्ष असून त्याला या गुन्ह्या प्रकरणी नागपुर शहर पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. झाले असे की, काही दिवसांपूर्वी नागपूरधील मनकापूरमध्ये राहणाऱ्या 64 वर्षाय प्रदीप मोंडावे यांच्या राहत्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची पोलिस तक्रार केली होती. यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणामध्ये प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याची माहित समोर आली.

प्रियांशूला नागपुर पोलिसांनी मंगळवारी (दि 22 नोव्हेंबर) रोजी अटक केले असून (दि, 25 नोव्हेंबर) रोजी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वीही प्रियांशूला रेल्वे प्रवासांचे मोबाईल चोरल्यामुळे अटक केले होते. प्रियांशूच्या या बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणात नागराज मंजुळे काय करतील हे पाहाणे फारच महत्वचं ठरेल.

झुंड चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्याशिवाय चित्रपटाचे कौतकही झाले. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. यामध्ये वंचित वस्तीतील मुलं काय करु शकतात हे दाखवले आहे. त्यामध्ये प्रियांशु याने बाबू नावाचे पात्र साकारत असताना “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, त्याचा हा डायलॉग फारच लोकप्रिय ठरला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राणा दा अन् पाठक बाईचं लगीन, आज ‘या’ शहरात घेणार सात फेरे
अभिनेते विक्रम गोखलेंबाबत मोठी बातमी! ‘लवकरच व्हेंटिलेटर काढणार, ते डोळेही उघडतायेत’, वाचा काय म्हटलेत डॉक्टर…

हे देखील वाचा