उडिया चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री झरना दास यांचे राहत्या घरी निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्या कुटुंबानी ही माहिती शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर)ला दिली. अभिनेत्री झरना दास वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रासल्या होत्या. गुरुवारी (दि. 1 डिसेंबर)ला रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे काैटुंबाने सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विट केले की, “मला प्रसिद्ध ओडिया चित्रपट अभिनेत्री झरना दास (jharna das) यांच्या निधनाची बातमी कळताच दुःख झाले. ओडिया चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्या नेहमीच स्मरणात राहतील. माझ्या शोकसंवेदना कुटुंब आणि त्यांच्या हितचिंतकांसोबत आहेत.” झरना दास यांच्या कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कटक येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घाेषना केली की, “त्यांचा अंत्यसंस्कार पूर्ण शासकीय इतमामात करण्यात येईल.” त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नाट्य आणि चित्रपटांमधील त्यांची प्रभावी कामगिरी नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. माझ्या शाेकसंवेदना त्यांच्या कुटुंबासाेबत आहे.” केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, ओडिया अभिनेत्री आणि भाजप नेत्या पिंकी प्रधान, केंद्र सरकारचे राज्यमंत्री जॉन बारला आणि चित्रपट जगतातील अनेक मान्यवरांनीही झरना दास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
सण 1945 मध्ये जन्मलेल्या झरना दास यांनी 1960 च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘हिसाबनिकस’, ‘पूजाफुला’, ‘अमदबता’, ‘श्री जगन्नाथ’, ‘नारी’, ‘आदिनामेघ’, ‘अभिनेत्री’, ‘मालजन्हा’ आणि ‘हीरा नाइला’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले. दास यांनी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) आणि नंतर कटक येथे दूरदर्शनचे सहायक स्टेशन डायरेक्टर म्हणूनही काम केले. ओडिशा सिने आर्टिस्ट असोसिएशनचे सचिव श्रीतम दास यांनी त्यांचे वर्णन एक नम्र आणि अतिशय मिलनसार व्यक्ती म्हणून केले आहे. श्रीतम दास म्हणाले, “जेव्हा त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा महिलांना थिएटर आणि चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंधने होती. त्यांनी सर्व अडचणींवर मात केली आणि एक कलाकार म्हणून त्याची कारकीर्द खूप उंचीवर गेली.”
झरना दास या प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगनाही होत्या. 2016 मध्ये त्यांना गुरू केलुचरण महापात्रा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. (south cinema veteran odia actress national film award jharna das dies)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
तीन – तीन लग्न करूनही नीलिमा अझीम आहेत एकट्याच, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी










