Saturday, April 20, 2024

तीन – तीन लग्न करूनही नीलिमा अझीम आहेत एकट्याच, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

बॉलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम देखील प्रसिद्धीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. 2 डिसेंबर 1958 रोजी दिल्लीत जन्मलेल्या नीलिमा अझीम आज त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. नीलिमाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘सडक’, ‘सूर्यवंशम’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘इश्क विश्क’ आणि ‘ब्लॅकमेल’ यांसारखे अनेक दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली. यासाेबतच त्यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही काम केले आहे. इतकंच नाही, तर नीलिमा खूप चांगली कथ्थक डान्सर देखील आहे. मात्र, नीलिमा यांचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी हाेते तितके वैयक्तिक जीवन गोंधळात. असे काय झाले नीलिमा यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया…

अभिनेत्री नीलिमा अजीम (neelima azeem) यांचे पहिले लग्न पंकज कपूरसोबत झाले होते. पंकज आणि नीलिमा यांची भेट तेव्हा झाली, जेव्हा अभिनेता थिएटर करत असे आणि नीलिमा यांना नृत्याच्या जगात स्वतःचे नाव कमवायचे होते. पंकज कपूर आणि नीलिमा पहिल्या भेटीतच चांगले मित्र बनले होते आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर लगेचच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 1975 मध्ये लग्न केले आणि त्यावेळी पंकज कपूर केवळ 21 वर्षांचे होते, तर नीलिमा फक्त 16 वर्षांच्या हाेत्या. लग्नानंतर 1981 मध्ये नीलिमा यांनी मुलगा शाहिद कपूरला जन्म दिला. मात्र, यानंतर दोघांमध्ये दुरावा सुरू झाला. दोघांमधील भांडण इतके वाढले की, काही काळानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पंकज कपूर यांनी 1984 मध्ये त्यांची पहिली पत्नी नीलिमा हिच्यापासून घटस्फोट घेतला आणि दोघांचे लग्न केवळ नऊ वर्षे टिकू शकले.

पंकज कपूरपासून वेगळे झाल्यानंतर नीलिमाचे हृदय टीव्ही अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट राजेश खट्टर यांच्यासाठी धडकत होते. दोघांनी 1990 मध्ये लग्न केले. ईशान खट्टर हा या दोघांचा मुलगा आहे. पंकज कपूरसोबतचे पहिले लग्न तुटल्यानंतर नीलिमाचे हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि ते दाेघेही 2001 साली विभक्त झाले. राजेश खट्टरसोबतचे लग्न तुटल्याबाबत अभिनेत्री म्हणाली, “काही गोष्टी झाल्या नसत्या तर कदाचित आमचे दुसरे लग्न टिकले असते. मात्र, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं. मला वाटतं, यावर अधिक कंट्रोल, अधिक लॉजिक आणि सेंस असती तर हे लग्न वाचवता आलं असतं, पण ते संपलं.”

पंकज कपूर आणि राजेश खट्टर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नीलिमाने 2004 मध्ये रझा अली खानशी लग्न केले. मात्र,  अवघ्या पाच वर्षांत त्यांचे नाते संपुष्टात आले. नीलिमा आणि रझा अली खान यांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला. (neelima azeem birthday special know about shahid kapoor mother career love life marriage and divorce)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी
आहा कडकच ना! रशियन महिलांवरही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा